सूर्य आग ओकत असताना, आपल्या शरीरातून घामाच्या धारा निघतात (Cleaning Tips). घामामुळे शरीराची दुर्गंधी आणि अनेक प्रकारच्या संसर्गाचा धोका वाढतो (Bathing Tips). उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेच्या ऍलर्जीच्या अनेक समस्या दिसून येतात. रेड रॅशेज, घामोळ्या, पुरळ, मुरुमांचे डाग, टॅनिंग यासह इतर समस्या निर्माण होतात (Summer Special). त्वचेच्या संसर्गामुळे खाज येते.
खाज येण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी, आपण एक उपाय करू शकता. अंघोळ करताना पाण्यात काही गोष्टी मिसळून आंघोळ करा. कडूलिंब, कोरफड आणि तुळशी अशा अनेक गोष्टी आहेत ज्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. हे आयुर्वेदात औषध म्हणून वापरले जातात. या गोष्टी पाण्यात मिसळून आंघोळ केल्याने शरीर स्वच्छ राहते(5 Simple Home Remedies For Fungal Infections!).
कडूलिंब
त्वचेचे संक्रमण टाळण्यासाठी कडुलिंब हा एक चांगला उपाय आहे. कडुनिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आढळतात, जे त्वचेचे संक्रमण दूर करण्यास मदत करतात. यासाठी कडुलिंबाची पाने पाण्यात उकळा, ते पाणी थंड करा, आंघोळीच्या पाण्यात मिसळा आणि आंघोळ करा. यामुळे स्किन इन्फेक्शनचा त्रास होणार नाही.
कांदे पोहे खाऊन कंटाळालात? कपभर पोहे आणि रवा; पोह्याच्या ढोकळ्याची पाहा सोपी रेसिपी
टी ट्री ऑइल
टी ट्री ऑइलमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आढळतात, जे आपल्या शरीराला बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करतात. आंघोळीच्या पाण्यात टी ट्री ऑइलचे काही थेंब घालून आंघोळ करा. स्किन क्लिन होईल.
एलोवेरा जेल
कोरफडीमुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि त्याच्या वापरामुळे जळजळ आणि संसर्गासारखे धोके दूर होतात. संसर्ग टाळण्यासाठी, आंघोळीच्या पाण्यात थोड्या प्रमाणात ताजे कोरफडीचे जेल मिसळा आणि त्या पाण्याने आंघोळ करा.
बाथरूमच्या टाईल्स मेणचट - टॉयलेट पिवळट झालंय? १० रुपयांची तुरटी वापरा, सोपा चकचकीत उपाय
रॉक सॉल्ट
रॉक सॉल्टमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात आणि ते त्वचा स्वच्छ करण्यास मदत करतात. आंघोळीच्या पाण्यात एक चमचा रॉक मीठ घाला आणि ते चांगले विरघळू द्या. त्यानंतर या पाण्याने आंघोळ करा.
गरम पाण्यात मध, रात्री दही खाणं घातक! आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात, आजारांना आमंत्रण देणं सोडा..
लिंबाचा रस
लिंबूमध्ये अॅसिडिक गुणधर्म असतात. जे बॅक्टेरिया काढून टाकतात आणि संक्रमणापासून संरक्षण देखील करतात. आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस घालून आंघोळ करावी. यामुळे आपल्याला फ्रेश वाटेल.