'पाणी' हा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी पाण्याची गरज असते. यामुळे दररोज किमान २ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक मानले जाते. याचबरोबर गरमीच्या दिवसात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी शक्य तितकं पाणी पित राहणे फार महत्वाचे असते. पाण्याच्या कमरतेमुळे डोकेदुखी, बद्धकोष्ठता, कोरडी त्वचा, सांधेदुखी, अपचन, रक्तदाब, लठ्ठपणा असे अनेक आजार उद्भवू शकता. त्यामुळे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपपर्यंत गरजेनुसार पाणी पीत राहणे आवश्यक असते(Eat these soaked superfoods on empty stomach to boost immunity).
सकाळी उठल्यानंतर कोणतंही पेय पिण्याआधी एक ग्लास पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करणे आरोग्यदायी मानले जाते. आपल्यापैकी काहीजणांना रात्री झोपताना वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी बिया, ड्रायफ्रुटस किंवा काही आयुर्वेदिक औषधी पदार्थ भिजत घालूंन सकाळी त्याचे पाणी पिण्याची सवय असते. काहीजण मेथी, ड्रायफ्रुट्स, भोपळ्याच्या बिया किंवा असे अनेक औषधी पदार्थ पाण्यात भिजत घालून त्याचे पाणी पितात. रात्री अशा काही पौष्टिक बिया पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरते. परंतु कोणत्या प्रकारच्या बिया आपल्या कोणत्या आरोग्याच्या समस्यांवर लाभदायक ठरतात हे आपल्याला माहित नसते. अशावेळी कोणत्या प्रकारच्या बिया पाण्यात भिजवून त्याचे पाणी पिण्याने आपल्या आरोग्याला त्याचा फायदा होईल ते पाहुयात(5 spice & seed-soaked in water for better health).
कोणत्या आहेत या ५ बिया ?
१. धणे :- धण्यांमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स, मिनरल्स, पोटॅशियम, फायबर आणि अनेक प्रकारचे अँटी - ऑक्सिडंट्स फार मोठ्या प्रमाणात असतात. धणे पाण्यात भिजवून त्याचे पाणी सकाळी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. याचबरोबर थायरॉईड आणि शरीराला डिटॉक्स करते.
मेहेंदीमध्ये चुकूनही मिक्स करु नका ' हे ' पदार्थ, आहेत ते केस गळतील - होईल नुकसान...
२. जिरे :- वजन कमी करणे, रक्तदाब नियंत्रण, पचनाच्या समस्या, मधुमेह नियंत्रण आणि अशक्तपणा यासाठी जिऱ्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. दररोज फक्त एक ग्लास जिरे पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जिरे पाणी चांगले पचन करण्यास मदत करते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते. जेव्हा पचनक्रिया व्यवस्थित असते तेव्हा शरीरातून विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात. त्यामुळे वजन आणि चरबी दोन्ही लवकर कमी होतात.
३. कलोंजी :- कलोंजी कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे. कलोंजी पोटाच्या समस्या दूर करू शकतात. यामुळे गॅस, ब्लोटिंग आणि पोटदुखी यांसारख्या समस्या दूर होतात. कलोंजीचे पाणी पिण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, शरीरातील कॉलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात तसेच ब्लड प्रेशर, अस्थमा अशा शारीरिक समस्या कमी करण्यास मदत करु शकतात.
दिवसभर कपड्यांवर गळालेले केस पाहून दु:खहोतं? ‘हे’ खास तेल लावा, केस गळणारच नाहीत...
४. बडीशेप :- बडीशेप भिजवून त्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. मासिक पाळीशी संबंधित समस्यांसाठी फायदेशीर, पचनक्रियेचे कार्य सुधारतात, वजन नियंत्रित ठेवण्यास हे बडीशेपचे पाणी पिणे उपयुक्त ठरते.
५. मेथी :- रात्री एक ग्लास पाण्यांत १ टेबलस्पून मेथी भिजवून सकाळी ते पाणी प्यायल्याने त्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. हार्मोनल्स बॅलेन्स, डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यास, तसेच मासिक पाळीच्या अनेक समस्यांवर फायदेशीर ठरते.
अशाप्रकारे आपण या ५ औषधी बिया रात्री पाण्यात भिजवून सकाळी त्याचे पाणी पिऊ शकता.