Join us   

बॅड कोलेस्टेरॉल कमी करायचं तर ५ प्रकारच्या बिया आहारात हव्याच, दिल-दिमाग दोन्ही तंदुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2023 8:44 PM

5 Super Healthy Seeds You Should Eat, to Reduce Cholesterol बॅड कोलेस्टेरॉल कमी करायला हवं या काळजीनेही शीण येतो, त्यासाठीच हा उपाय

पावसाळा असो किंवा हिवाळा, बॅड कोलेस्टेरॉलची समस्या बाराही महिने छळते. कोलेस्टेरॉल हे २ प्रकारच्या असतात. एचडीएल कोलेस्टेरॉलला गुड तर, एलडीएल कोलेस्टेरॉलला बॅड कोलेस्टेरॉल म्हणतात. गुड कोलेस्टेरॉल जितके चांगले आहे, तितकेच बॅड कोलेस्टेरॉल धोकादायक ठरू शकते. बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले की, नसांमधून हृदयाला पुरेसे रक्त मिळत नाही, ज्यामुळे हृदयाच्या निगडीत आजार निर्माण होतात.

एलडीएल अर्थात बॅड कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल तर, आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी. यासंदर्भात, लखनऊच्या बलरामपूर हॉस्पिटलचे आयुर्वेदाचार्य डॉ जितेंद्र शर्मा यांनी ५ बियांबद्दल माहिती दिली आहे, जे भिजवून खाल्ल्याने बॅड कोलेस्टेरॉल कमी होऊ शकते(5 Super Healthy Seeds You Should Eat, to Reduce Cholesterol).

मेथीचे दाणे

बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मेथीचे दाणे उपयुक्त ठरू शकतात. यामध्ये तांबे, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, फॉलिक अॅसिड, फायबर, जीवनसत्त्वे A, C, K आणि B6 इत्यादी मुख्य पोषक घटक आढळतात. मेथीचे दाणे केवळ कोलेस्टेरॉलच नाही तर, रक्तातील साखरेवरही नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी ठरते. यासाठी एका वाटीत एक चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत ठेवा. या बिया सकाळी रिकाम्या पोटी खा. त्यानंतर एक ग्लास पाणी प्या. असे नियमित केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

रात्रीच्या जेवणात कोणत्या डाळी आणि कडधान्यं अजिबात खाऊ नयेत? तज्ज्ञ सांगतात, पचनाचे त्रास

सूर्यफुलाच्या बिया

वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आपण आहारात सूर्यफुलाच्या बियांचा समावेश करू शकता. त्यातील आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि फॅटी ऍसिड, नसांमधून वाईट कोलेस्टेरॉल कमी  करतात. यासाठी सूर्यफुलांच्या बिया रात्रभर पाण्यात भिजत ठेवा, व सकाळी रिकाम्या पोटी या बिया खा. यातील पौष्टीक घटक वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतील.

चिया सीड्स

जर आपल्याला रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल तर, आहारात चिया सीड्सचा समावेश करा. चिया सीड्समध्ये पाण्यात विरघळणारे फायबर मुबलक प्रमाणात आढळते. यासाठी एक चमचा चिया सीड्स रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी त्याचे सेवन करा. यामुळे एलडीएलची पातळी कमी होईल.

अल्कलाइन पाणी प्या, ॲसिडिटीसह-वजन होईल कमी! -आध्यात्मिक गुरु श्री.श्री. रविशंकर यांचा विशेष सल्ला

मनुका

मनुका खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते. मनुक्यांमध्ये गुड कोलेस्टेरॉल वाढवण्याचे गुणधर्म आढळतात. यासाठी एक चमचा मनुका रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. व सकाळी रिकाम्या पोटी मनुका व त्याचे पाणी प्या. नियमित असे केल्याने वाईट कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊ शकते.

फ्लेक्ससीड

फ्लेक्ससीड हे फायबरचा समृद्ध स्रोत म्हणून ओळखले जाते. अळशीच्या बिया खाल्ल्याने रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. यासाठी एक चमचा अळशीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. व सकाळी रिकाम्या पोटी या बिया खा. यामुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी होईल, व गुड कोलेस्टेरॉल वाढेल.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य