मॅग्नेशियम हा एक अतिशय महत्त्वाचा घटक. पण अशा एखाद्या घटकाची आपल्या शरीरात कमतरता असू शकते, किंवा त्या कमतरतेमुळे आपल्याला काही त्रास होऊ शकतो, असा विचारही आपल्या डोक्यात येत नाही. कारण बऱ्याचदा आपला फोकस हा फक्त कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन्स, पोटॅशियम अशा घटकांवर असतो. पण हे घटक आपल्या आहारात पुरेशा प्रमाणात असले तरीही काही विशिष्ट प्रकारच्या शारिरीक तक्रारी कमी होत नाहीत. म्हणूनच शरीरात जर मॅग्नेशियम कमी प्रमाणात असेल तर त्यामुळे खासकरून महिलांना कोणते त्रास होऊ शकतात (5 symptoms that shows magnesium deficiency) आणि त्यासाठी कोणते पदार्थ आवर्जून खायला पाहिजे (magnesium rich food), याविषयीची ही विशेष माहिती एकदा बघा... (how to overcome magnesium deficiency?)
तुमच्याही शरीरात मॅग्नेशियमची कमतरता आहे का?
Frontiers in Nutrition journal यांनी प्रकाशित केलेल्या अभ्यासामध्ये शरीरातील मॅग्नेशियमची कमतरता आणि त्यामुळे होणारे शारिरीक त्रास याबाबतची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी असं नमूद केलं आहे की तुम्हाला जर सतत स्नायूंचा थकवा जाणवत असेल तर एकदा शरीरातले मॅग्नेशियमचे प्रमाण तपासून पाहा.
घरातल्या माशा-चिलटं-डास-पाली-झुरळं घालविण्याचे सोपे उपाय, घर राहील चकाचक आणि इन्फेक्शन होईल कमी
प्रौढ महिलांना जवळपास ३५० एमजी एवढ्या मॅग्नेशियमची दररोज गरज असते. ती पूर्ण होऊ शकली नाही तर मासिक पाळीदरम्यान त्यांना जास्त वेदना होतात. बहुतांश महिलांना पाळी येण्याच्या काही दिवस आधी आणि पाळीदरम्यान पोटऱ्यांमध्ये गोळे येतात, पाय ओढल्यासारखे होतात. हा त्रास मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होतो. याशिवाय मूडस्विंग, पोट गुबारणे, चिडचिड वाढणे, एन्झायटी असे त्रासही मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होऊ शकतात.
मॅग्नेशियमची कमतरता भरून काढणारे पदार्थ
डार्क चॉकलेट, अव्हाकॅडो, बदाम, काजू, डाळी, बीन्स, मटार, सोयाबीन, टोफू, जवस, भोपळ्याच्या बिया,
शाकाहारी लोकांना भरपूर प्रोटीन देणारे ६ पदार्थ, महागडे प्रोटीन शेक पिण्याची गरजच नाही
चिया सीड्स, ओट्स, बार्ली, केळी, हिरव्या पालेभाज्या या पदार्थांमधून चांगल्या प्रमाणात मॅग्नेशियम मिळते. याशिवाय हल्ली मॅग्नेशियम सप्लिमेंट्सही बाजारात मिळतात. पण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्या घ्याव्या.