Join us   

व्हजायनल हेल्थसाठी धोकादायक ठरतात ५ प्रकारची पेयं, अतिरेक टाळला नाहीतर नाजूक आजारांना आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2022 2:45 PM

Vaginal Disease व्हजायनल हेल्थ हा नाजूक विषय त्याविषयी आधीच महिला बोलत नाहीत, आजारांकडे दुर्लक्ष करतात. मात्र परिणाम गंभीर होऊ शकतात

महिलांसाठी व्हजायनल हेल्थ अर्थात योनी आणि योनीमार्गाचे आजार, आरोग्य हे अतिशय नाजूक विषय आहेत. या संदर्भात अपुरी माहिती असल्यामुळे ते एकतर काळजी घेतली जात नाही किंवा आजाराकडे दुर्लक्ष केले जाते. प्रजनन वयात प्रवेश करण्यापूर्वी ते मेनोपॉजनंतर योनीच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.  फक्त पाळी अथवा सेक्ससंदर्भातच हे महत्त्वाचे नसून एकुण आरोग्यासाठीही त्याकडे लक्ष दिले पाहिजे. स्त्री रोग विशेषज्ज्ञ आणि आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. नीरज शर्मा यांनी हेल्थ शोट्स या वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार काही पेयांचा अतिरेकही योनीच्या आजारांना आमंत्रण ठरू शकतो.

मूड बुस्टर कॉफीचा ओव्हरडोज

कॉफीमध्ये अधिक प्रमाणात कॅफिन असते, ज्याचे अधिक सेवन आपल्या आरोग्यासह योनीसाठी देखील हानिकारक ठरू शकते. जास्त काॅफीचे सेवन केल्याने योनीमार्गातील बायोम नष्ट होते. यासह शरीराचा आणि योनीचा पीएच लेवल खराब होते. कॉफीचे जर नियंत्रणात सेवन केले तर याचा फटका बसणार नाही. परंतु अधिक सेवन केल्याने शरीरामध्ये इतर आजार देखील उद्भवण्यास सुरुवात होऊ शकते. कॉफीमुळे होणाऱ्या व्हजायल डिहायड्रेशनमुळे योनीच्या आतील अस्तरांना इजा होऊ शकते.

हळदीचे पाणी पिण्याचा अतिरेक

तज्ज्ञांच्या मते, हळदीचे जास्त सेवन केल्याने आपल्या शरीरात लोहाची कमतरता होऊ शकते. लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात ॲनिमिया होऊ शकतो, ज्यामुळे रिप्रोडक्टिव हेल्थ आणि प्रजननक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. हळदीचे पाणी वेट लॉस, इम्युनिटी बूस्ट आणि ग्लोइंग स्किनसाठी उपयुक्त ठरते. परंतु, या पाण्याचे अधिक सेवन केले तर याचा परिणाम थेट योनीवर होते.

चहावर चहा

कॉफीप्रमाणेच चहामध्येही कॅफिन असते. सामान्य चहापेक्षा कॅफिनचे प्रमाण ग्रीन टी अथवा ब्लॅक टीमध्ये अधिक असते. चहाचे अधिक सेवन केल्याने डिहायड्रेशन होऊ शकते. ज्याचा थेट परिणाम आपल्या योनीच्या आरोग्यावर होऊ शकतो आणि योनीमार्गाच्या कोरडेपणाची समस्या देखील उद्भवू शकते.

काढ्यामधे भरमसाठ मसाले

सर्वसाधारण हिवाळ्यात अनेकजण थंडीपासून बचावासाठी काढ्यात अनेक मसाले टाकून पितात. लवंग, वेलची, काळीमिरी हे काढ्यात टाकल्याने  शरीर तंदुरस्त, इन्फेक्शनपासून लांब आणि उबदार राहते. मात्र, त्याचे अधिक सेवन देखील आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकत नाही. तज्ञांच्या मते काढा आपल्या शरीराला गरम आणि उबदार बनवतो, मात्र त्याचे अधिक सेवन केल्याने आपली योनी कोरडी पडू लागते. यासह योनीचा पीएच खराब होतो. 

कोल्डड्रिंक अथवा सोडा

कोल्डड्रिंक, सोडा, अथवा इतर गोड पेय याचे अधिक सेवन हे शरीरासाठी चांगले नाही, याचा थेट परिणाम योनीवर होतो. याचे अधिक सेवन केल्याने मेटाबॉलिक सिंड्रोम होण्याची शक्यता अधिक असते. गोड पदार्थांच्या सेवनाने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे योनीचे आरोग्यही बिघडू शकते.

टॅग्स : महिलालाइफस्टाइलस्त्रियांचे आरोग्य