Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोज सकाळी रिकाम्यापोटी पाण्यासोबत 'हा' पदार्थ घ्या; दिवसभर नियंत्रणात राहील ब्लड शुगर

रोज सकाळी रिकाम्यापोटी पाण्यासोबत 'हा' पदार्थ घ्या; दिवसभर नियंत्रणात राहील ब्लड शुगर

How to Control Sugar Level : डायबिटीस नियंत्रणात ठेवण्याचे काही घरगुती उपाय  आहेत. या उपायांचा अवलंब करून तुम्ही गंभीर आजार टाळू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 10:35 AM2023-01-18T10:35:29+5:302023-01-18T10:40:03+5:30

How to Control Sugar Level : डायबिटीस नियंत्रणात ठेवण्याचे काही घरगुती उपाय  आहेत. या उपायांचा अवलंब करून तुम्ही गंभीर आजार टाळू शकता.

5 types of leaves extract with water to control blood sugar level naturally | रोज सकाळी रिकाम्यापोटी पाण्यासोबत 'हा' पदार्थ घ्या; दिवसभर नियंत्रणात राहील ब्लड शुगर

रोज सकाळी रिकाम्यापोटी पाण्यासोबत 'हा' पदार्थ घ्या; दिवसभर नियंत्रणात राहील ब्लड शुगर

डायबिटीसच्या आजारावर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध झालेले नाही. डायबिटीसमुळे शरीराच्या विविध अंगांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. याशिवाय हा आजार मृत्यूचं कारणही ठरू शकतो. डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नियमित हेल्दी डाएट म्हणजेच कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचे सेवन करायला हवे. (5 types of leaves extract with water to control blood sugar level naturally)

डायबिटीस नियंत्रणात ठेवण्याचे काही घरगुती उपाय  आहेत. या उपायांचा अवलंब करून तुम्ही गंभीर आजार टाळू शकता. नोएडातील आयुर्वेद क्लिनिकचे डायरेक्टर डॉक्टर कपिल त्यागी यांनी ब्लड शुगर कमी करण्याचे उपाय सांगितले आहेत. 

कढीपत्ता

कढीपत्त्याचा उपयोग भारत आणि शेजारच्या देशांमध्ये पदार्थांना चव येण्यासाठी केला जातो. एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार डायबिटीजमध्ये कढीपत्त्त्याचं सेवन शुगर लेव्हल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं कढीपत्त्यात फायबर्स असतात. तसं यामुळे इंसुलिन वाढण्याचं काम होतं. 

तुळशीची पानं

तुळशीची पानं आयुर्वेदातील सगळ्यात शक्तीशाली औषधं आहेत.  या औषधांचे फक्त धार्मिक महत्व नसून यात गंभीर आजारांपासन लढण्याची शक्ती असते. जर  तुम्हाला डायबिटीस नियंत्रणात ठेवायचं असेल तर पाणी उकळून प्यायला हवं. तुळशीच्या पानात ब्लड शुगर कमी करण्याची क्षमता असते. 

इंसुलिनची पानं

मधुमेहाच्या रुग्णांसाठी इन्सुलिन प्लांट एखाद्या औषधापेक्षा कमी नाही. एनसीबीआयच्या अभ्यासानुसार या वनस्पतीच्या पानांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. या वनस्पतीच्या पानांचे सेवन करणाऱ्या मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचे अभ्यासात आढळून आले आहे.

आंब्याची पानं

आंब्याच्या पानांमध्ये मॅंगिफेरिन हे एन्झाइम असते ज्यामध्ये अल्फा ग्लुकोसिडेस प्रतिबंधित करण्याची क्षमता असते, जे आतड्यांतील कार्बोहायड्रेट चयापचय कमी करण्यास मदत करते आणि रक्तातील साखर वाढण्यास प्रतिबंध करते. आंब्याच्या पानांमध्ये इन्सुलिन वाढवण्याची आणि ग्लुकोज नियंत्रित करण्याची क्षमता असते. आंब्याच्या पानांमध्ये पेक्टिन, व्हिटॅमिन सी आणि फायबर देखील असतात. हे दोन्ही मिळून मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल या दोन्हींसाठी फायदेशीर आहेत.

पेरूची पानं

एनसीबीआयमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार  पेरूच्या पानांचा रस शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. पेरूची पानं अल्फा ग्लूकोसिडेज ची क्रिया रोखतो. हे एक एंजाईम आहे जे स्टार्च आणि अन्य कार्बोहायड्रेट्सला ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करते. तुम्ही आंब्याची पानं गरम पाण्यात उकळून चहाप्रमाणे पिऊ शकता.
 

Web Title: 5 types of leaves extract with water to control blood sugar level naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.