Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सकाळी पोट डब्ब - नीट साफही होत नाही? रात्री ५ डाळी चुकूनही खाऊ नका; दिवसभर राहाल अस्वस्थ आणि..

सकाळी पोट डब्ब - नीट साफही होत नाही? रात्री ५ डाळी चुकूनही खाऊ नका; दिवसभर राहाल अस्वस्थ आणि..

5 types of pulses that you must avoid in Dinner! : रात्री ५ डाळी चुकूनही खाऊ नका, पोटात भयंकर तयार होईल गॅस; अॅसिडिटीमुळे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2024 01:28 PM2024-06-09T13:28:30+5:302024-06-09T17:15:13+5:30

5 types of pulses that you must avoid in Dinner! : रात्री ५ डाळी चुकूनही खाऊ नका, पोटात भयंकर तयार होईल गॅस; अॅसिडिटीमुळे..

5 types of pulses that you must avoid in Dinner! | सकाळी पोट डब्ब - नीट साफही होत नाही? रात्री ५ डाळी चुकूनही खाऊ नका; दिवसभर राहाल अस्वस्थ आणि..

सकाळी पोट डब्ब - नीट साफही होत नाही? रात्री ५ डाळी चुकूनही खाऊ नका; दिवसभर राहाल अस्वस्थ आणि..

रात्रीचे जेवण विचारपूर्वक करायला हवे (Pulses). काही जण रात्रीच्या वेळेस पचनास हलक्या पदार्थांचा आहारात समावेश करतात (Digestion Problem). तर काही जण भरपेट जेवण करतात (Health Care). रात्रीच्या वेळेस आपण डाळ - भात, चपाती - भाजी खातो. डाळ - भात आहारात हमखास असतेच. परंतु रात्रीच्या वेळीस काही डाळींचे सेवन केल्याने पोट जड होते. यामुळे गॅस आणि ॲसिडिटी सारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रात्री हलके अन्न खावे.

रात्री डिनरमध्ये चणा डाळ, उडीद डाळ, राजमा, चवळी आणि मूग डाळ खाल्ल्याने पचनास त्रास होऊ शकते. रात्रीच्या वेळी डाळी पचणे कठीण होऊ शकते. त्यामुळे रात्री हलक्या कडधान्यांचे सेवन करावे(5 types of pulses that you must avoid in Dinner!).

रात्रीच्या वेळेस कोणत्या डाळी खाऊ नये..

चणा डाळ

रात्रीच्या वेळेस चणा डाळ खाल्ल्याने गॅसट्रिकची समस्या निर्माण होऊ शकते. चणा डाळ पचनास जड असते. यात फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पचनसंस्था बिघडू शकते. यासह बद्धकोष्ठतासारखी समस्या निर्माण होऊ शकते.

मुलं स्वत:हून अभ्यासालाच बसत नाहीत? आईबाबा, करा फक्त ४ गोष्टी- न सांगता मुलं करतील अभ्यास

उडीद डाळ

उडदाच्या डाळीमुळे गॅसेसचा त्रास होऊ शकतो. रात्री याचे सेवन केल्याने पोट फुगणे आणि पचनाच्या समस्या वाढू शकतात. हा पोटदुखीचा त्रास सहसा लवकर कमीही होत नाही.

बिन्स

किडनी बीन्समध्ये जास्त प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असते, त्यामुळे रात्री पचायला त्रास होतो. यामुळे गॅस आणि अपचन होऊ शकते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस राजमा खाणं टाळा.

शाळेत जाताना भीतीपोटी मुल रडतं? करा सोप्या ४ गोष्टी; शाळेत रमतील - अभ्यासही करतील

चवळी

चवळीचे पदार्थ आपण खाल्लेच असतील. त्यात फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे रात्रीच्या वेळेस पचनक्रियेत अडथळे येऊ शकतात. शिवाय गॅस्ट्रिकची समस्या देखील उद्भवू शकते.

मूग डाळ

रात्रीच्या वेळेस आपली पचनक्रिया मंदावते. आपल्याल हालचाली कमी होतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेस मूग डाळ खाणं टाळा. यात फायबरचे प्रमाण जास्त असते. अशावेळी पचनसंस्थेत अडथळे येऊ शकतात. 

Web Title: 5 types of pulses that you must avoid in Dinner!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.