Join us   

१ चमचा मध खाण्याचे ५ फायदे, वजन कमी होण्यापासून मेंदू तेज होण्यापर्यंत गुणकारी मध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2023 12:00 PM

5 Unique Health Benefits of Honey मधाचे सेवन करण्याचे ६ जादुई फायदे, पाहा कोणत्या पद्धतीने याचे सेवन केल्याने फायदा होतो

नैसर्गिक स्वीटनर म्हणून मधाचा (Honey) वापर केला जातो. मध खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पदार्थात मध मिक्स केल्याने पदार्थाची चव दुपट्टीने वाढते. कित्येक आजारांवर उपाय म्हणून आयुर्वेदिक उपचारांमध्ये याचा वापर केला जातो. मधामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, खनिजे, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, झिंक, कॉपर, सेलेनिअम, जीवनसत्त्व इत्यादी पोषक तत्त्वांचाही समावेश असतो. मधाचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. 

यासंदर्भात, आहारतज्ज्ञ, व पब्लिक हेल्थ एक्सपर्ट स्वाती बथवाल यांनी मध खाण्याचे फायदे शेअर केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ''शुद्ध मध खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. जर आपण सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यात मध मिसळून पीत असाल तर, वजन कमी होण्यास मदत मिळते. यासह रात्री दुधात मिसळून प्यायल्यास ब्रेन हेल्थला याचा फायदा होतो''(5 Unique Health Benefits of Honey).

मधाचे फायदे

मधाचा वापर अनेक प्रकारे केला जातो. यातील गुणधर्म शरीर डिटॉक्स करते. मधामध्ये अँटिऑक्सिडंट, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम कॉपर, पोटॅशियम, मॅंगनीज आणि जस्त भरपूर प्रमाणात आढळते. मध फक्त शरीरासाठी नाही तर, त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरते. म्हणून अनेक प्रकारच्या फेस वॉश, स्क्रब आणि फेस पॅकमध्ये मधाचा वापर केला जातो.

अल्कलाइन पाणी प्या, ॲसिडिटीसह-वजन होईल कमी! -आध्यात्मिक गुरु श्री.श्री. रविशंकर यांचा विशेष सल्ला

मध खाण्याचे ५ फायदे 

- मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

- ब्रेन हेल्थसाठी दुधात मध घालून पिण्याचा सल्ला देण्यात येतो. ज्यामुळे स्ट्रेस कमी होते, व मन शांत राहते.

स्त्रियांचं वजन भराभर आणि खूप का वाढतं? ७ कारणं, वाढत्या वजनासह आजारांचा धोका टाळा

- मधामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. हिरड्यांवर मध लावल्यास तोंडाच्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

- लिंबाच्या रसात मध मिसळून प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते. ज्या लोकांना उन्हाळ्यात उष्णतेचा जास्त त्रास होतो त्यांनी हे रस प्यावे.

- वजन कमी करायचे असेल तर, रोज सकळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मध मिसळून प्या. हे शरीर डिटॉक्स करते, ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य