Join us   

विराट कोहली-अक्षय कुमार खातात ‘तशा’ उकडून खा भाज्या, पोषण भरपूर देणाऱ्या ५ भाज्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2024 3:57 PM

5 Vegetables You Should Eat Boiled: उकडलेल्या भाज्या खाल्ल्याने आरोग्याला मिळतील फायदेच फायदे

आपल्या तब्येतीबाबत सतर्क किंवा फिटनेसकडे अधिक लक्ष देणारे लोक उकडलेल्या भाज्या खाण्यास पसंती दर्शवतात (Boiled Vegetables). अनेक सेलिब्रिटी भाज्या उकडून खातात. उकडलेल्या भाज्या खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. यामध्ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स असतात (Healthy Foods). ज्यामुळे ऋतूबदलामुळे होणारे आजार टाळता येऊ शकतात.

शिवाय उकडलेल्या भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते (Vegetables). ज्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते. शिवाय पचनसंस्थाही योग्यरित्या कार्य करते. आपण भाज्या सहसा फ्राईड, शिजवून किंवा भाजून खातो. या प्रकारे भाज्या खाल्ल्याने त्यातील पोषणमूल्ये नष्ट होऊ लागतात. त्यामुळे उकडलेल्या भाज्या खाण्यास प्राधान्य द्या. यामुळे शरीराला पौष्टीक घटक मिळू शकतात(5 Vegetables You Should Eat Boiled).

या प्रकारच्या भाज्या उकडून खा, शरीराला मिळतील फायदेच - फायदे

गाजर

आपण गाजर सहसा कच्चे खातो. पण उकडलेले गाजर खणायचे अनेक फायदे आहेत. यामुळे शरीराला जास्त पोषक तत्व मिळतील. गाजरांमध्ये उच्च बीटा कॅरोटीन असते जे व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. बीटा कॅरोटीनचे प्रमाण उकळल्याने आणखी वाढते. ज्याचा फायदा थेट शरीराला होतो.

वजन वाढेल म्हणून भजी खाणं टाळताय? ५ टिप्स; वजन वाढू नये म्हणून किती आणि कधी खावी? पाहा..

टोमॅटो

टोमॅटोचा वापर आपण भाज्या किंवा चटणी तयार करण्यासाठी करतो. टोमॅटोमध्ये लाइकोपीन कंपाऊंड असते, जे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. आपण टोमॅटो कच्चा खाण्याऐवजी उकडून खाऊ शकता. यामुळे टोमॅटोमधील गुणधर्म शरीराला पुरेपूरपणे मिळतील.

ब्रोकोली

फ्लॉवरसारखी दिसणारी ब्रोकोली खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण ब्रोकोली नेहमी उकडून खावी. ब्रोकोलीमध्ये सल्फोराफेन नावाचे संयुग आढळते. जे फ्राईड केल्याने बिघडते. जेव्हा आपण ब्रोकोली उकळवण्यासाठी ठेवतो, तेव्हा ते मायरोसिनेज एन्झाइम सोडण्यास मदत करते. या एंझाइममुळे ग्लुकोराफेनिनचे सल्फोराफेनमध्ये रूपांतर होते. ज्यामुळे शरीराला फायदेच मिळतात.

शाळा उघडली की मुलांना खायला द्या ४ पदार्थ, मुलांचं अभ्यासात लागेल लक्ष-वाढेल एकाग्रता

बटाटा

बटाटे अनेक जण तळून किंवा भाजून खातात. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.  व्हिटॅमिन सी तळल्यानंतर नष्ट नष्ट होऊ शकतात. त्यामुळे बटाटे नेहमी उकडून खा. शिवाय सासोबत बटाटे खा. कारण बटाट्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी जास्त आढळते.

बीटरूट

सलाडमध्ये काही लोक बीटरूट खातात. पण कच्चे खाण्यापेक्षा आपण बीटरूट उकडून खाऊ शकता. बीटरूटमध्ये व्हिटॅमिन बी असते. शिवाय बीटरूट उकडून खाल्ल्याने फोलेटचे प्रमाण वाढते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्नभाज्या