Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > बळकट हाडांसाठी फक्त दूध पिता? त्यात घाला '५' गोष्टी; बॅड कोलेस्टेरॉल घटेल - हृदयही राहील निरोगी

बळकट हाडांसाठी फक्त दूध पिता? त्यात घाला '५' गोष्टी; बॅड कोलेस्टेरॉल घटेल - हृदयही राहील निरोगी

5 Ways That Drinking Milk Can Improve Your Health : दुधाची शक्ती वाढवण्यासाठी फक्त दूध पिऊ नका; त्यात ५ गोष्टी घाला..वाढेल ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2024 04:52 PM2024-09-29T16:52:50+5:302024-09-29T16:53:59+5:30

5 Ways That Drinking Milk Can Improve Your Health : दुधाची शक्ती वाढवण्यासाठी फक्त दूध पिऊ नका; त्यात ५ गोष्टी घाला..वाढेल ताकद

5 Ways That Drinking Milk Can Improve Your Health | बळकट हाडांसाठी फक्त दूध पिता? त्यात घाला '५' गोष्टी; बॅड कोलेस्टेरॉल घटेल - हृदयही राहील निरोगी

बळकट हाडांसाठी फक्त दूध पिता? त्यात घाला '५' गोष्टी; बॅड कोलेस्टेरॉल घटेल - हृदयही राहील निरोगी

दूध (Milk) पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत (Milk). दूध प्यायल्याने गंभीर आजारांचा धोका कमी होतो (Health Tips). कॅल्शियम आणि विविध जीवनसत्त्वेयुक्त दूध फक्त हाडं मजबूत आणि उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर नसून, इतरही अनेक फायदे आहेत (Bones). दुधातील पौष्टीक गुणधर्म वाढवण्यासाठी आपण त्यात ६ गोष्टी मिसळू शकता. यामुळे फक्त हाडंच नसून, संपूर्ण आरोग्य सुदृढ राहते(5 Ways That Drinking Milk Can Improve Your Health).

दुधातील गुणधर्म

दुधामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि निरोगी चरबी यांसारखे आवश्यक बहु-पोषक घटक आढळतात. यामुळे हाडं मजबूत, शिवाय स्नायू बळकट होतात. व्हिटॅमिन डीमुळे मेंदूचे कार्य सुधारते. जर आपल्याला फक्त दूध आवडत नसेल तर, आपण दुधात काही गोष्टी मिसळून पिऊ शकता.

साडीवर फॅशनेबल ब्लाऊज शिवायचंय? बघा मागच्या गळ्याचे ९ स्टायलिश डिझाइन्स- साडी नेसून दिसाल ग्लॅमरस

दुधात कोणते पदार्थ घालून प्यायल्याने फायदा होतो?

हळद

टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटनुसार, 'बरेच जण दुधात हळद घालून पितात. याला गोल्डन मिल्कही म्हणतात. हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. शिवाय त्यात दाहक विरोधी गुणधर्म आणि कर्क्यूमिन कंपाऊंड असते. ज्यामुळे संधिवात किंवा हाडांशी संबंधित इतर वेदना कमी होऊ शकतात.

आलं

दुधात आपण आल्याचा किस किंवा आल्याची पावडर घालू शकता. अपचन, मळमळ, उलट्यांचा त्रास होत असेल तर, दुधात आलं घाला. आल्यामध्ये दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट प्रभाव असतो, ज्यामुळे उलट्या आणि अपचनाचा त्रास कमी होतो.

साबुदाणा भिजत न घालता कुरकुरीत चकली करा इन्स्टंट; फक्त १५ मिनिटात उपवासाची चकली रेडी

मध

बरेच लोक साखरेऐवजी मध मिसळून दूध पितात. मधात यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. घसादुखी आणि कफ कमी करण्यासाठी मध गुणकारी आहे. जर आपल्याला झोपेची समस्या असेल तर, दुधात मध घालून प्या.

दालचिनी

दुधात चिमूटभर दालचिनी पावडर मिसळून प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होते. त्यात शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. जर आपण मधुमेहग्रस्त आहेत, त्यांनी दुधात दालचिनी पावडर घालून अवश्य प्यावे.

बदाम

बदामामध्ये फायबर, प्रोटीन, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ई इत्यादी पोषक घटक असतात. दुधात बदाम पावडर घालून प्यायल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. आणि हृदय निरोगी राहते.

Web Title: 5 Ways That Drinking Milk Can Improve Your Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.