Join us   

नकळत वाढेल बीपीचा त्रास, वेळीच फॉलो करा ५ घरगुती सोपे उपाय, ब्लड प्रेशर होईल नॉर्मल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2023 12:59 PM

5 ways to control high blood pressure without medication : डब्ल्यूएचओचा दावा - भारतात ५.८ दशलक्ष लोक उच्च रक्तदाबापासून त्रस्त, वेळीच काळजी घ्या

उत्तम आरोग्यासाठी ब्लड प्रेशर कण्ट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे. अनेकदा ब्लड प्रेशर वाढते किंवा कमी होते. ही बाब शरीरासाठी घातक ठरू शकते. उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर ज्याला हायपरटेंशन देखील म्हटलं जातं. हाय ब्लड प्रेशर फक्त ज्येष्ठांनाच नाही तर आताच्या युवा पिढीला देखील शिकार करत आहे. त्यामुळे वेळीच यावर कण्ट्रोल ठेवणं गरजेचं आहे.

जगभरातील एक तृतीयांश लोकसंख्येला हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे. यावर योग्य उपचार केल्यास २०५० पर्यंत सुमारे ७६ दशलक्ष मृत्यू टाळता येऊ शकते. असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. डब्ल्यूएचओच्या अहवालात असे म्हटले गेले आहे की, आयएचसीआय अंतर्गत जून २०२३ पर्यंत भारतातील २७  राज्यांमधील, सुमारे ५.८ दशलक्ष लोकांवर उपचार केले जात होते(5 ways to control high blood pressure without medication).

डब्ल्यूएचओनुसार, जगभरातील ३० ते ७९ वर्षे वयोगटातील सुमारे एक तृतीयांश लोक, उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. यापैकी केवळ ५४ टक्के लोकांचे निदान झाले आहे. ४२ टक्के लोकांवर उपचार सुरू आहेत. तर २१ टक्के लोकांचे हाय ब्लड प्रेशर कण्ट्रोलमध्ये आहे.

हाय ब्लड प्रेशरची लक्षणे

छातीत दुखणे

ब्लड प्रेशर वाढल्यावर छातीत दुखू लागते. छातीत अस्वस्थता आणि दबाव जाणवू लागतो. ज्यामुळे अनेकदा श्वास घेण्यासही अडचण होते.

डोकेदुखी

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना अनेकदा डोकेदुखीचा त्रास होतो.

मुठभर चणे-शेंगदाणे खाण्याचे ५ जबरदस्त फायदे, पाहा खाण्याची योग्य पद्धत व फायदे

चक्कर येणे

उच्च रक्तदाबामुळे माणसाला अनेकदा चक्कर येते.

कमकुवत दृष्टी

ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांची दृष्टी कमकुवत होऊ लागते.

कोरडा खोकला आणि थकवा

काही प्रकरणांमध्ये, रुग्णाला सतत कोरडा खोकला आणि थकवा जाणवू लागतो.

हाय ब्लड प्रेशर कण्ट्रोलमध्ये आणण्यासाठी उपाय

दिनचर्येत बदल

नियमित व्यायाम करा, जसे की, चालणे, योग करणे, जिमला जाणे. शरीराची हालचाल ठेवा. वेळेवर जेवा. आहारात भाज्या, फळे, कडधान्ये, अशा पौष्टीक पदार्थांचा समावेश करा. व्यायामासह आराम देखील तितकेच गरजेचं आहे. ८ तासांची झोप हवीच. यासह मेडिटेशन करायलाही विसरू नका. यामुळे स्ट्रेस कमी होते.

नैसर्गिक पदार्थ खा

रात्री जेवल्यानंतर फक्त २ मिनिटं करा शतपावली, वजन कमी आणि शुगर कण्ट्रोल करण्यासाठी सोपा उपाय

लसूण: लसूणमध्ये सल्फर असते, जे उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

काळी मिरी: काळी मिरीमध्ये पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

तुळस: तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

लिंबू पाणी : रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस पिळून प्यायल्याने रक्तदाब कमी होतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य