Join us   

विसरभोळेपणा वाढतोय का, नावं-गोष्टी लक्षात राहत नाहीत? ५ टिप्स-स्मरणशक्ती वाढेल कायमची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2023 6:12 PM

5 Ways to Keep Your Memory Sharp at Any Age : स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ५ उपाय, विसराळूपणावर शोधा कायमचा उपाय

जास्त ताण घेणे, शारीरिक हालचालींची कमतरता, सतत काम करणे किंवा एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करणे यामुळे लोकं स्ट्रेसला बळी पडतात. यामुळे त्याचा आरोग्यावर फार वाईट परिणाम तर होतोच, शिवाय स्मरणशक्तीही कमजोर होते. आपण प्रत्येक लहान गोष्टी विसरू लागतो. अशा परिस्थितीत स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी नियमित व्यायाम आणि आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

याशिवाय शरीराला काही आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळणे गरजेचं आहे (Memory Sharp). न्यूरोलॉजिस्ट आणि आरोग्य प्रशिक्षक डॉ.प्रियांका शेरावत यांनी मेंदूच्या उत्तम आरोग्यासाठी ५ टिप्स शेअर केल्या आहेत. या टिप्सच्या मदतीने मेंदूला चालना मिळेल, शिवाय स्मरणशक्तीही वाढेल(5 Ways to Keep Your Memory Sharp at Any Age).

रिव्हिजन

तीक्ष्ण स्मरणशक्ती हवी असेल तर, एखाद्या गोष्टीचं सतत रिव्हिजन करत राहा. एकाच गोष्टीचा वारंवार अभ्यास केल्याने ती गोष्ट लक्षात ठेवण्यास मदत होते. रिव्हिजनमुळे आपले सायनॅप्स मजबूत होतात. ज्यामुळे लहान-सहान गोष्टी विसरण्यासारख्या गोष्टी आपल्यासोबत घडत नाही.

५ मिनिटं अजून म्हणत गजर झाल्यावरही झोपून राहता? ३ टिप्स, पहाटे उठणं होईल एकदम सोपं

संगीत

संगीताचा स्मरणशक्तीवर अद्भुत प्रभाव पडतो. हार्वर्ड विद्यापीठातील अभ्यासानुसार, संगीत ऐकणे किंवा सादर करणे मेंदूचा भाग सक्रिय करण्यास मदत करतात. जे स्मृती, भावना, स्पीड आणि रिवार्डवर कण्ट्रोल ठेवतात.

नवीन स्किल शिका

जेव्हा आपण नवीन कोणतेही प्रकारचे स्किल्स शिकतो, तेव्हा मेंदूमध्ये नवीन सायनॅप्स, नवीन क्रिया क्षमता आणि नवीन कनेक्शन तयार होतात. जे आपल्या मेंदू आणि स्मरणशक्तीसाठी अत्यंत गरजेचं आहे. यामुळेच मुलांची मने खूप तीक्ष्ण असतात कारण ते रोज काहीतरी नवीन शिकत असतात.

वॉक किंवा व्यायाम केल्यानंतर कोमट पाणी प्यावे की थंड? डॉक्टर सांगतात कोणते पाणी कधी आणि केव्हा प्यावे..

पंचेद्रियांचा पूर्ण वापर

मानवाला एकूण ११ इंद्रिये असतात. त्यांपैकी डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये महत्वाच्या आहेत. या सर्व इंद्रियांचा शक्य तितका वापर करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही अभ्यासक्रम लक्षात ठेवत असाल तर ते बोलून करा. अशा प्रकारे तुम्ही तुमचे डोळे, तोंड आणि कान वापरून तुमचा अभ्यास दीर्घकाळ लक्षात ठेवू शकाल.

मेडिटेशन

ध्यान केल्याने मन शांत होते. मुख्य म्हणजे तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी मदत करते. जे लोक दररोज २० मिनिटे ध्यान करतात त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. मेंदूची शक्ती वाढवण्याचा हा एक उत्तम आणि सोपा मार्ग आहे.

टॅग्स : हेल्थ टिप्समानसिक आरोग्यआरोग्य