Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पावसाळ्यात मलेरियाचे वाढले रुग्ण, मलेरिया होऊच नये म्हणून ‘अशी’ घ्या काळजी, ॲडमिट होण्याचा धोका टाळा...

पावसाळ्यात मलेरियाचे वाढले रुग्ण, मलेरिया होऊच नये म्हणून ‘अशी’ घ्या काळजी, ॲडमिट होण्याचा धोका टाळा...

Malaria Prevention & Control : What are the best ways to prevent malaria : पावसाळ्यात थोडीशी काळजी घेतली तर मलेरिया सारख्या संसर्गजन्य आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2024 07:15 PM2024-06-13T19:15:34+5:302024-06-13T19:33:54+5:30

Malaria Prevention & Control : What are the best ways to prevent malaria : पावसाळ्यात थोडीशी काळजी घेतली तर मलेरिया सारख्या संसर्गजन्य आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो..

5 ways to prevent malaria how can you prevent malaria Malaria Prevention and Control | पावसाळ्यात मलेरियाचे वाढले रुग्ण, मलेरिया होऊच नये म्हणून ‘अशी’ घ्या काळजी, ॲडमिट होण्याचा धोका टाळा...

पावसाळ्यात मलेरियाचे वाढले रुग्ण, मलेरिया होऊच नये म्हणून ‘अशी’ घ्या काळजी, ॲडमिट होण्याचा धोका टाळा...

पावसाळा आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे समीकरण ठरलेले आहे. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. पावसाळ्यात विविध प्रकारच्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. साचलेल्या पाण्यातून विविध आजार उद्भवण्याचा धोका अधिक असतो. या दिवसांत डेंग्यू, चिकनगुन्या, मलेरिया यांसारख्या  आजारांचं प्रमाण वाढतं. यापैकी मलेरिया ताप हा एक संसर्गजन्य आजार आहे, जो डासांमुळे होतो. या आजारामध्ये तीव्र तापासोबत इतरही काही लक्षण दिसून येतात. मलेरिया झाला असता त्या व्यक्तीची विशेष काळजी घेणे गरजेचे असते(Malaria Prevention and Control).

डास चावल्यामुळे होणाऱ्या मलेरिया या आजारामुळे भारतात दरवर्षी लाखो रुग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे या आजाराची रुग्णांमध्ये मोठी दहशत आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात या आजाराचे रुग्ण सापडतात. मुंबईत गेल्या सहा महिन्यात या आजाराचे १,६१२ रुग्ण आढळून आले आहेत. या आजाराचा परिणाम थेट मानवाच्या मेंदूवर आणि किडनीवर होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. तेव्हा पावसाळ्यात मलेरिया होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी ते पाहूयात(What are the best ways to prevent malaria).

मलेरिया होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ? 

१. पाणी साचू देऊ नका :- आपल्या घराच्या अवती - भवती पाणी साचू देऊ नका. ज्या ठिकाणी पाणी साचते त्या भागात डासांचे प्रमाण वाढते. डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होते. जुने टायर, जुनी भांडी, कुंड्या यांमध्ये पाणी साचू देऊ नका. घराजवळील सांडपाण्याचा निचरा करणे तसेच पाणी साठू न देणे हा सर्वोत्तम उपाय आहे. 

२. पौष्टिक आहार घ्या :- जेव्हा एखाद्या व्यक्तीला मलेरिया होतो तेव्हा शरीराला कॅलरी आणि पौष्टिक घटकांची गरज असते. त्यामुळे आजारी व्यक्तींनी या काळात उच्च उष्मांक युक्त आहार घ्यावा. आपण तांदळा ऐवजी गहू आणि बाजरीचे पदार्थ खाऊ शकता. तांदूळ सहज पसतो त्यामुळे वेगाने ऊर्जा बाहेर पडते मलेरियाच्या रुग्णांसाठी ताजी फळे आणि भाज्या खाणे देखील फायदेशीर ठरू शकते. बीट, गाजर, पपई, द्राक्ष, बेरी, संत्री यासारख्या विटामिन 'ए' आणि विटामिन 'सी' समृद्ध फळे आणि भाज्या मलेरियांच्या रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. 

योनीमार्गात प्रचंड कोरडेपणा, सतत आग - जळजळ होण्याची ५ कारणं, त्रास कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात...  

३. प्रथिनांचे प्रमाण वाढवा :- मलेरियाच्या बाबतीत उतींचे प्रमाण झपाट्याने संपुष्टात येते, त्यामुळे प्रथिनांचे प्रमाण वाढवण्याची गरज असते यासाठी उच्च कार्बोहायड्रेट आणि प्रथिने युक्त आहार फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे या काळात लस्सी, ताक पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. 

४. हे पदार्थ खाऊ नका :- मलेरियाची लागण झाल्यानंतर हिरव्या पालेभाज्या, जाड साल असलेली फळे आणि संपूर्ण धान्य यांसारखे हाय फायबर असलेले पदार्थ खाणे टाळा. यासोबतच तळलेले, मैदा आणि अति गोड पदार्थ खाणे टाळावे. या काळात जास्त गरम आणि मसालेदार पदार्थ खाऊ नये कारण त्यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

यासोबतच काही छोट्या - छोट्या गोष्टी देखील लक्षात ठेवल्या पाहिजेत :- 

१. मच्छरदाणी लावून झोपणे.  
२. मलेरियाची साथ असेल तर डास चावू नये म्हणून अंगभर कपडे घालणे.  
३. डास चावू नये म्हणून प्रतिबंधात्मक क्रिम लावणे.  
४. जंतुनाशक फवारणी सर्व ठिकाणी करून घेणे 
५. तापात हलका आहार घेणे आणि औषधांचा कोर्स पूर्ण करणे.

Web Title: 5 ways to prevent malaria how can you prevent malaria Malaria Prevention and Control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.