Join us   

जेवणानंतर पोट फुग्यासारखं टम्म फुगतं? न ५ गोष्टी खा, अपचनाचा त्रास होणारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2024 2:43 PM

5 ways to reduce bloating: Quick tips and long-term relief : खाण्याच्या सवयींमध्ये छोटे बदल करून, आपण आतड्याचे आरोग्य सुधारू शकता..

उन्हाळा सुरु होताच, शरीराची लाही लाही होतेच, शिवाय पोटाची देखील आग होते (Indigestion Problems). या दिवसात आपण पचायला हलके पदार्थ खाण्यास प्राधान्य देतो (Home Remedies). पण बऱ्याचदा हलके पदार्थ खाल्ल्यानेही पोटाचे विकार वाढतात. पोटात उष्णता, छातीत जळजळ होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, आंबट ढेकर येणे, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता अशा समस्यांना लोकांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात पोट निरोगी ठेवण्यासाठी काही खबरदारी घेणे गरजेचं आहे.

उन्हाळ्यात पोटाचे विकार झाल्यास कोणत्या घरगुती उपाय करून पाहावे, याची माहिती आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे(5 ways to reduce bloating: Quick tips and long-term relief).

आलं

जर आपल्याला पोटाचे विकार छळत असतील तर, आपण आल्याचा रस पिऊ शकता. आल्याच्या रसात विविध अँटीऑक्सिडंट असतात. ज्यामुळे पोटातील जळजळ कमी होते. त्याचबरोबर गॅस्ट्रो एसोफेजल रिफ्लेक्सलासुद्धा कमी करण्यास मदत करते. इतकेच नव्हे, तर उलट्या होणे, मळमळ यांसारख्या गोष्टी कमी करण्यास फायदेशीर ठरते.

ताक

ताक हे पोटासाठी अमृत ठरते. ताक चवीला आंबट असलं तरी, पचनक्रिया जलद होण्यास मदत होते.  ताकाचे जिवाणू प्रोबायोटिक असतात. जे आपल्याला तंदुरुस्त ठेवतात. ज्यांना शरीरतील अतिरिक्त कॅलरीज बर्न करायच्या असतील, त्यांनी रोज ताक पिणे फायदेशीर ठरू शकते.

साउथमध्ये घरोघरी जसं दही खातात, ‘तसं’ खा, बॅड कोलेस्टेरॉल विसरा आणि वजनही होईल कमी

रॉक शुगर

रॉक शुगर हा साखरेचा सर्वात शुद्ध प्रकार आहे. याचा वापर आपण मुखवासासाठी करतो. पण याच्या वापराने अन्नाचे व्यवस्थित पचन होते. जेवणानंतर बडीशेप आणि खडी साखर खाल्ल्याने अन्न लवकर पचते, आणि पचनाच्या समस्या कमी होतात.

तूप

तूप आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ए आढळते. शिवाय त्यातील इतर पौष्टीक घटकांमुळे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. यासह बद्धकोष्ठता आणि मुळव्याधीसरखा त्रास आपल्याला छळत नाही. 

FSSAI म्हणते 'या' पिठाच्या चपात्या खा; बीपीही नॉर्मल आणि हाडंही होतील मजबूत! पाहा कोणतं ते पीठ

जिरे, धणे आणि बडीशेप घालून केलेला चहा

पोट फुगण्यापासून ते मासिक पाळीच्या वेदनांपर्यंत, जिरे, धणे आणि बडीशेप घालून केलेला चहा प्यायल्याने आराम मिळतो. मुख्य म्हणजे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यासाठी एका भांड्यात एक ग्लास पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक चमचा जिरं, धणे आणि बडीशेप घालून मिक्स करा. ५ मिनिटांसाठी उकळवा. नंतर गाळून प्या. यामुळे गॅसेसची समस्या टळेल. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य