Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > स्वयंपाकासाठी-फराळासाठी कोणते खाद्यतेल वापरता? ‘हे’ ५ वापरत असाल तर बॅड कोलेस्टेरॉल नक्की वाढेल..

स्वयंपाकासाठी-फराळासाठी कोणते खाद्यतेल वापरता? ‘हे’ ५ वापरत असाल तर बॅड कोलेस्टेरॉल नक्की वाढेल..

5 Worst Oils for Your Health, that increases bad cholesterol : आपल्या आहारासाठी आणि आरोग्यासाठी कोणते तेल जास्त चांगले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2023 03:01 PM2023-11-02T15:01:26+5:302023-11-02T15:02:22+5:30

5 Worst Oils for Your Health, that increases bad cholesterol : आपल्या आहारासाठी आणि आरोग्यासाठी कोणते तेल जास्त चांगले?

5 Worst Oils for Your Health, that increases bad cholesterol | स्वयंपाकासाठी-फराळासाठी कोणते खाद्यतेल वापरता? ‘हे’ ५ वापरत असाल तर बॅड कोलेस्टेरॉल नक्की वाढेल..

स्वयंपाकासाठी-फराळासाठी कोणते खाद्यतेल वापरता? ‘हे’ ५ वापरत असाल तर बॅड कोलेस्टेरॉल नक्की वाढेल..

तेल शरीरासाठी महत्वाचे. तेलामुळे शरीराला आवश्यक चरबी आणि कॅलरीज मिळतात. शिवाय शरीराला ए, डी, ई आणि के सारख्या चरबी-विरघळणारे जीवनसत्त्वे शोषण्यास मदत करतात. पण अतिप्रमाणात तेल खाणं आरोग्यासाठी घातक ठरू शकते. बरेच लोक अन्नामध्ये कमी किमतीच्या तेलाचा वापर करतात. पण याच्या वापरामुळे आपण जीवाशी खेळ करतोय एवढं मात्र नक्की.

कारण यात सॅच्युरेटेट फॅट्स, ट्रान्स फॅट असते. जे शरीरासाठी धोकादायक मानले जाते. यामुळे हृदयरोग, लठ्ठपणा यासह इतर गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. आपल्या आरोग्यासाठी कोणते तेल योग्य नाही? या तेलांचा वापर का टाळावा? याची माहिती, पोषणतज्ज्ञ शिखा अग्रवाल यांनी दिली आहे(5 Worst Oils for Your Health, that increases bad cholesterol).

आरोग्यासाठी कोणत्या ५ प्रकारचे तेल घातक

पाम तेल

पाम तेलामध्ये सॅच्युरेटेट फॅट्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. अशावेळी नसा ब्लॉक होतात. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. शिवाय हृदयाच्यानिगडीत इतर आजारही निर्माण होतात.

हळद लावा-दात पिवळे नाही होणार उलट पांढरेशुभ्र होऊन चमकतील, घ्या हळीदीचे ३ सोपे उपाय

खोबरेल तेल

खोबरेल तेल केसांसाठी उत्तम मानले जाते. पण याचा वापर पदार्थ तयार करण्यासाठी करू नका. कारण यात सॅच्युरेटेट फॅट्सचे प्रमाण जास्त असते. शिवाय त्यात मिडीयम सिरीज ट्रायग्लिसराइड्स असतात. ज्यामुळे एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, व हृदयविकार होण्याचा धोका वाढतो.

कॉर्न ऑइल

कॉर्न ऑइलमध्ये ओमेगा -६ फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीरावर सूज निर्माण होऊ शकते. तर, ओमेगा -६ आरोग्यासाठी आवश्यक असते. पण याचे अतिसेवन करणे टाळावे. यामुळे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो.

वॉटर हिटर रॉडवर पांढरा थर जमा झालाय? वेळीच साफ करा, अन्यथा वाढेल वीज बिल, पाहा रॉड स्वच्छ करण्याची २ सोप्या ट्रिक्स

वेजिटेबल ऑइल

वेजिटेबल ऑइल सोयाबीन, कॉर्न आणि सूर्यफूल यांच्या मिश्रणापासून तयार केले जाते. या तेलामध्ये ओमेगा-६ फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे नसा ब्लॉक होऊ शकतात. अशावेळी हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

सनफ्लॉवर ऑइल

अनेक घरात सनफ्लॉवर ऑइलचा वापर होतो. पण याचा अतिरिक्त वापर आरोग्यासाठी नक्कीच घातक ठरू शकते. कारण त्यात सॅच्युरेटेट फॅट्सचे प्रमाण जास्त असते. शिवाय त्यात ओमेगा-६ फॅटी ऍसिड आहे. यामुळे शरीरावर सूज निर्माण होऊ शकते.

Web Title: 5 Worst Oils for Your Health, that increases bad cholesterol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.