भारतात मधुमेहींचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. प्रौढांमध्ये तर त्याचे प्रमाण आहेच, पण आता तर अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांनाही डायबिटिस (diabetes) असल्याचं निदर्शनास येत आहे. प्री- डायबेटीक (pre- diabetic) स्टेजमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची, प्रौढांची संख्या तर खूप मोठी आहे. हा आजार एकदा मागे लागला की आयुष्यभर त्याचं पथ्यपाणी सांभाळावं लागतं. कारण खाण्यापिण्यात बदल झाला की त्याचा थेट परिणाम रक्तातील साखरेचे प्रमाण कमी- जास्त होण्यावर होतो. म्हणूनच मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी ICMR म्हणजेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च इंडिया यांनी नुकताच एक अभ्यास केला असून त्याद्वारे ५५- २० हा खास मंत्र (55-20 formula for controlling diabetes) मधुमेहींना दिला आहे.
ICMR तर्फे या अभ्यासासाठी एकूण १८, ०९० एवढ्या मधुमेह असणाऱ्या रुग्णांची केस स्टडी करण्यात आली. काही दिवसांसाठी या सगळ्यांच्या आहारावर काटेकोर लक्ष ठेवण्यात आले. या अभ्यासातून जे काही समोर आले, त्यावरून मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा प्री- डायबेटिक स्टेजचे रुपांतर डायबिटीजमध्ये होऊ नये, यासाठी आहार कसा असावा, याविषयी काही निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
कसा आहे ५५ - २० चा फॉर्म्युला?
१. या अभ्यासातून सगळ्यात मुख्य निष्कर्ष असा काढण्यात आला आहे की, मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमच्या आहारातले कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण ५० ते ५५ टक्क्यांनी कमी करा. तसेच आहारातील प्रोटीनचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढवा.
पालकांच्या 3 चुका मुलांचा कॉन्फिडन्स कायमचा कमी करतात, बघा तुम्हीही नकळत असंच तर चुकत नाही?
२. या अभ्यासाचे प्रमुख डॉ. व्ही. मोहन यांनी सांगितले की कार्बोहायड्रेट्स खूप जास्त प्रमाणात घेतल्याने मधुमेह नियंत्रणाबाहेर जातो. त्यामुळे मधुमेहींनी आहारातले कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण सांभाळायला पाहिजे. जेवणाचं ताट कसं वाढलेलं असावं, याविषयी सांगताना ते म्हणाले की अर्धे ताट भरून भाज्या असाव्या. तसेच उरलेल्या ताटात प्रोटीन्स आणि भात- पोळी असं असावं.