आवळा (Amla) हा एक सुपरफूड आहे. आवळ्यात अनेक गुणधर्म असतात (Health Benefits). आकाराने लहान जरी असले तरी, आवळा खाल्ल्याने तब्येतीच्या अनेक तक्रारी दूर होतात (Amla with Salt). आवळ्यामध्ये व्हिटामीन सी, व्हिटामीन एबी कॉप्लेक्स, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आयर्न, कार्बोहायड्रेट, फायबर्स आढळते (Gooseberry). यामुळे शरीराची इम्युनिटी तर वाढतेच, यासह वजन कमी, केस आणि त्वचा तरुण - टवटवीत दिसते. पण आवळा खाताना बरेच लोक काही चुका करतात. आवळा नक्की कोणत्या पद्धतीने खायला हवा याची माहिती नसते.
आयुर्वेदात आवळ्याला खूप महत्व आहे. आयुर्वेदाचे डॉ नंबी नंबूदिरीनुसार आवळा नेहमी मीठासोबत खावा. आमचे वडीलही हाच सल्ला देतात.' पण यामागे काय कारण आहे आणि मोठा आवळा खायला चांगला आहे की छोटा आवळा? याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे(6 Amazing Health Benefits of eating Amla with Salt).
आवळा-मीठ खाण्याचे फायदे?
आयुर्वेदात एकूण ६ रस आहेत. डॉक्टरांच्या मते, आवळ्यामध्ये खारट रस वगळता, सर्व रस आहेत. त्यामुळे आवळा नुसता खाण्यापेक्षा आपण त्यात मीठ घालून खाऊ शकता. मिठामुळे आवळ्यातील आंबटपणा संतुलित होतो. अशाप्रकारे शरीराला आवळ्याचे सर्व फायदे मिळू शकतात.
ऐन हिवाळ्यात तुळस सुकली? ५ टिप्स -तुळस होईल हिरवीगार आणि डेरेदार, पाहा सोपे उपाय
आवळ्यातील २ गुणधर्म आरोग्यासाठी उत्तम
आयुर्वेदिक डॉक्टरांनी आवळ्याचे दोन मुख्य गुणधर्म सांगितले आहेत. त्याला धात्री आणि रसायनी म्हणतात. धात्री म्हणजे आईप्रमाणे रक्षण करणे आणि रसायनी म्हणजे पालनपोषण करणे. म्हणजेच आवळा शरीराला आजारांपासून वाचवण्यासोबतच पोषण देण्याचं काम करतो.
थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा
कोणता आवळा खायला चांगला?
आता प्रश्न पडतो की आवळा कोणत्या प्रकारचा खायला चांगला आहे. बाजारात दोन प्रकारचे आवळे उपलब्ध आहेत, एक लहान आकाराचा आणि दुसरा मोठा. तज्ज्ञांच्या मते, लहान आकाराचा आवळा आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. आपण त्याला मीठ लावून खाऊ शकता. पण त्यात तेल आणि मिरची लावून, म्हणजेच त्याचे लोणचे बनवून खाऊ नये. यामुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.