Join us   

थंडीत खायलाच हवा आवळा, 'सुपर फ्रूट' खाण्याचे ६ जबरदस्त फायदे, वर्षभर तब्येत राहील ठणठणीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2023 9:10 AM

6 Amazing Health Benefits Of having Amla gooseberry in winter season : आवळ्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराला अनेक आजारांशी लढण्यास मदत करतात.

हिवाळा म्हणजे आरोग्यासाठी उत्तम कालावधी. उन्हाळा आणि पावसाळ्यात भाज्या, फळे जास्त प्रमाणात उपलब्ध नसतात. पण थंडीच्या काळात बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळे मुबलक प्रमाणात आणि कमी किमतीत उपलब्ध असतात. थंडीच्या काळात शरीराला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते तसेच वर्षभर तब्येत ठणठणीत राहावी यासाठी या काळात आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाते. प्रतिकारशक्ती चांगली राहावी यादृष्टीने या काळात व्यायाम करणे,आहारात जास्तीत जास्त पौष्टीक पदार्थांचा समावेश करणे या गोष्टी आवर्जून केल्या जातात. थंडीत इतर फळांसोबत बाजारात आवर्जून दिसणारे रानमेव्यातील एक फळ म्हणजे आवळा.

आवळा भारतासह आसपासच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. आवळ्यातील औषधी गुणधर्मांमुळे त्याला 'सुपर फ्रुट' म्हटले जाते.आवळा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असून यापासून केलेली आवळा कँडी, मोरावळा, आवळ्याचे लोणचे यांचा आहारात समावेश केल्यास आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी दूर होण्यास मदत होते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर असते. आवळ्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराला अनेक आजारांशी लढण्यास मदत करतात. पाहूयात आवळा खाण्याचे शरीराला होणारे फायदे (6 Amazing Health Benefits Of having Amla gooseberry in winter season)...

१. पचनाशी निगडीत तक्रारींवर आवळा किंवा मोरावळा अतिशय फायदेशीर ठरतो. गॅसेस, बद्धकोष्ठता, अॅसिडीटी, कोठा जड होणे यांसारख्या तक्रारींसाठी आवळा खाणे उपयुक्त असते.  

२. आवळ्यात तांबे आणि झिंक यासोबतच क्रोमियम हा घटकही असतो. या तिन्ही घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहाते आणि हदयाशी संबंधित आजारांचा धोका टळतो. सध्या हृदयाशी निगडीत तक्रारींचे प्रमाण वाढले असून आवळा खाण्यासारखे उपाय आवर्जून करायला हवेत. 

३. महिला आणि लहान मुलांमध्ये साधारणपणे हिमोग्लोबिनची कमतरता असते. अशावेळी मोरावळा किंवा आवळा कँडी खाल्ल्यास हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. भारतात अॅनिमियाच्या रुग्णांची संख्या जास्त असून ती दूर होण्यासाठी आवळा खाणे हा उत्तम उपाय आहे. 

४. आवळ्यात क आणि ई ही दोन्ही जीवनसत्त्वं मोठ्या प्रमाणात असतात. या दोन्ही जीवनसत्त्वांचा फायदा म्हणजे त्वचेचा रंग उजळतो, चेहऱ्यावर चमक येते. त्वचेसोबतच डोळ्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आवश्यक असणारे अ जीवनसत्त्वही आवळ्यात असते.  

(Image : Google)

५. आवळ्यात अँण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण भरपूर असतं. याचा फायदा प्रतिकारशक्ती वाढण्यापासून ते इतर अनेक समस्या दूर होण्यासाठी होतो. थंडीच्या दिवसांत मिळणारे हे फळ आवर्जून खायला हवे, यामुळे वर्षभर तब्येत चांगली राहण्यास मदत होते.

६. आवळ्यामध्ये सोल्यूबल फायबर भरपूर असते जे शरीरात वेगाने विरघळते. त्याच्या मदतीने शरीरातील साखर शोषण्याची गती कमी होते. यामुळे रक्तातील झपाट्याने वाढणारी साखरही कमी होते. म्हणूनच टाईप 2 मधुमेहाच्या रूग्णांसाठी आवळा खाणे हा उत्तम उपाय आहे.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सफळेथंडीत त्वचेची काळजीआहार योजना