Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वेट लॉस, केस मजबूत आणि त्वचा टवटवीत हवीय? मग 'हा' पांढरा लाडू रोज खा; हृदयविकारही राहील दूर

वेट लॉस, केस मजबूत आणि त्वचा टवटवीत हवीय? मग 'हा' पांढरा लाडू रोज खा; हृदयविकारही राहील दूर

6 Amazing Health Benefits Of Super Grain Amaranth Ladoo : पांढरा लाडू रोज खाण्याचे '६' जबरदस्त फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2024 09:57 PM2024-08-25T21:57:34+5:302024-08-26T17:25:14+5:30

6 Amazing Health Benefits Of Super Grain Amaranth Ladoo : पांढरा लाडू रोज खाण्याचे '६' जबरदस्त फायदे

6 Amazing Health Benefits Of Super Grain Amaranth Ladoo | वेट लॉस, केस मजबूत आणि त्वचा टवटवीत हवीय? मग 'हा' पांढरा लाडू रोज खा; हृदयविकारही राहील दूर

वेट लॉस, केस मजबूत आणि त्वचा टवटवीत हवीय? मग 'हा' पांढरा लाडू रोज खा; हृदयविकारही राहील दूर

उत्तम आरोग्यासाठी आहाराकडे लक्ष देणं गरजेचं (Rajgira Laddoo). पौष्टीक घटकांमुळे शरीराला काम करण्याची उर्जा मिळते. शिवाय अवयव योग्यरित्या कार्य करतात. पण बऱ्याचदा आहाराकडूनही आपल्याला पौष्टीक घटक मिळत नाही (Health Benefits). पौष्टीक आहारांमध्ये प्रोटीन गरजेचं आहे. प्रोटीनमुळे वजन नियंत्रणात, हाडांना बळकटी मिळते, एकंदरीत संपूर्ण आरोग्य सुदृढ राहते.

जर आपल्याला दिवसभर अ‍ॅनर्जेटिक आणि अॅक्टिव्ह राहायचं असेल तर, राजगिऱ्याचा लाडू खा. जन्माष्टमीनिमित्त राजगिरा लाडू खाल्ले जातात. आपणही प्रोटीनची गरज भागवण्यासाठी रोज एक राजगिरा लाडू खाऊ शकता. राजगिरा लाडू खाण्याचे फायदे किती? यातून शरीराला  कोणते पौष्टीक घटक मिळतात? पाहा(6 Amazing Health Benefits Of Super Grain Amaranth Ladoo).

प्रोटीनचे उत्तम सोर्स

यु. एस. डिपार्टमेण्ट  ऑफ अग्रिकल्चरच्या वेबसाईटनुसार, '१०० ग्रॅम प्रोटीनमध्ये १३. ६  ग्रॅम प्रोटीन असते. नियमित राजगिऱ्याचे लाडू खाल्ल्याने स्नायूंना बळकटी मिळते. शिवाय त्यांची  दुरुस्ती देखील जलद होते. यामुळे केस मजबूत आणि त्वचाही टवटवीत दिसते.

अक्षय कुमार उठल्यानंतर करतो १ 'खास' काम; पन्नाशीतही तंदुरुस्त राहायचं असेल तर..

ग्लूटेन मुक्त लाडू

राजगिरा हे ग्लुटेन मुक्त पदार्थ आहे. जे फिटनेस फ्रिक आहेत, ते लोक राजगिरा लाडू खाऊ शकता. शिवाय यामुळे ॲलर्जी, पोटदुखी, गॅस अशा अनेक समस्या दूर करू शकता.

मिनरल्स

राजगिऱ्याला मिनरल्सचा खजिना म्हणतात. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि लोह आढळते. ज्यामुळे हाडं मजबूत, दातांचे आरोग्य सुधारते, शिवाय रक्ताभिसरणात कोणतीही अडचण येत नाही.

पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते

शरीर दररोज अनेक मुक्त रॅडिकल्सशी लढत राहते. हे खूप धोकादायक असतात आणि शरीराला आतून नुकसान करतात. यामुळे पेशींचे नुकसान होते. यामुळे कॅन्सरसारखा भयंकर आजार होऊ शकतो. राजगिरा दाण्यांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स ते दूर करतात.

हृदयासाठी निरोगी

राजगिऱ्यांमध्ये फायबर आणि फायटोकेमिकल्स आढळतात. हे हृदयासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहते. यासह बॅड कोलेस्टेरॉलही वाढत नाही. या कारणांमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

वजन वाढतं म्हणून चपाती बंद केली? कणकेत घाला ३ गोष्टी; वजन वाढणारच नाही; उलट..

वेट लॉससाठी मदत

वजन कमी करायचे असेल तर राजगिरा खा. त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. 

Web Title: 6 Amazing Health Benefits Of Super Grain Amaranth Ladoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.