Join us   

भरपूर पाणी प्यायल्याने खरेच आजार कमी होतात ? ६ त्रास होतील कमी, फक्त तपासा पाणी किती पिता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2023 5:52 PM

6 benefits of drinking water in the morning : आरोग्याच्या लहान - मोठ्या तक्रारी दूर करण्यासाठी देखील दिवसभर योग्य प्रमाणात पाणी पिणे फायदेशीर ठरते.

पाणी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. पाण्याशिवाय जीवन नाही असे म्हटले जाते. पाणी हा आपल्या जीवनातील सर्वात महत्वाचा घटक आहे. आपण कित्येक दिवस न खाता राहू शकतो, परंतु पाण्याशिवाय आपण जगूच शकत नाही. पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करणे आरोग्यदायी ठरते. पाणी पिण्याचे अनेक फायदे असतात. शरीराच्या चांगल्या कार्यासाठी पाणी पिणं गरजेचं असतं. जर आपण पाणी कमी प्यायलो तर गंभीर आजारही उद्भवू शकतात. आयुर्वेदात सकाळी रिकाम्या पोटी कोमट पिण्याचे बरेच फायदे सांगण्यात आले आहेत(Is drinking water a lot good for health?).

'पाणी पिणे' हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. पाणी पिण्यावर आपल्या संपूर्ण शरीराचे चक्र अवलंबून असते. पाणी शरीराच्या अवयवांचे आणि ऊतींचे संरक्षण करते आणि शरीरातील पेशींना पोषक आणि ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करते. दररोज मुबलक पाणी पिण्याने रोगांशी लढण्यास मदत होते, म्हणूनच योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याचे इतके फायदे (Health Benefits of Drinking Enough Water) आपल्या शरीराला व आरोग्याला तर होतातच. यासोबतच आरोग्याच्या लहान - मोठ्या तक्रारी दूर करण्यासाठी देखील दिवसभर योग्य प्रमाणात पाणी पिणे फायदेशीर ठरते(What will happen if I drink a lot of water everyday?).

पाणी पिण्यामुळे आरोग्याच्या कोणत्या तक्रारी दूर होतात ? 

१. पोटाशी संबंधित आजार :- पाणी पिण्यामुळे पोटाशी संबंधित अनेक लहान - मोठ्या आजरांवर मात करता येते. जर आपली पचनक्रिया सुरळीत सुरु असेल तर आपल्याला पोटासंबंधित कोणत्याच प्रकारचे आजार होत नाही. यामुळेच आपल्या पचनक्रियेचे कार्य सुरळीत सुरु राहण्यासाठी दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते. योग्य प्रमाणात पाणी पिण्यामुळे गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटी यांसारख्या पोटाच्या लहान - सहान तक्रारी दूर होण्यास मदत मिळते. 

तासंतास ऑफिसमध्ये बाक काढून - वाकून बसता ? चुकीच्या बॉडी पोश्चर सुधारण्याचे ७ फायदे, पाठीचा कणा सांभाळा...

२. वजन वाढीवर नियंत्रण :- वाढलेले वजन कमी करण्यात आहार व योग्य डाएटसोबतच पुरेसे पाणी पिणे महत्वाचे ठरते. पाणी प्यायल्यामुळे आपले पोट बऱ्याचकाळासाठी भरलेले राहते. पोट भरलेले असल्यामुळे आपण ओव्हर इटिंग करण्यापासून स्वतःला रोखू शकतो. यामुळे वजन नियंत्रणात राहते. याचबरोबर वजन कमी करण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी पिणे फायदेशीर ठरते. 

३. हेल्दी त्वचेसाठी :- दिवसातून ८ ते १० ग्लास पाणी पिणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. अनेक डॉक्टर्स पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाणी पिणे हे आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय होण्यास मदत करते आणि आपली त्वचा अधिक चमकदार राहण्यासाठी याचा अधिक फायदा होतो. वाढत्या वयोमानानुसार आपल्या चेहऱ्यामध्ये बदल होत असतात. सुरकुत्या येणे, त्वचा सैल पडणे, त्वचेवर डाग पडणे असे अनेक बदल दिसत असतात. पण जर आपण योग्य प्रमाणात पाणी पीत राहिलात तर त्वचा अधिक हेल्दी राहण्यास मदत मिळते. गरम पाणी शरीरातील विषारी द्रवपदार्थ बाहेर फेकण्याचे काम करते. शरीर डिटॉक्स करण्याचा हा सोपा उपाय आहे. यामुळे त्वचा अधिक हेल्दी राहते. 

मलासनात बसून पाणी पिण्याचे आहेत भन्नाट फायदे, पोटाचे विकार अनेक समस्या होतील कायमच्या दूर...

४. डोकेदुखी :- आपल्यापैकी काहीजणांना सतत डोकेदुखीचा त्रास जाणवतो. जर आपल्याला हा डोकेदुखीचा त्रास कमी करायचा असेल तर दिवसभरात पुरेसे पाणी पिणे गरजेचे असते. आपल्या मेंदूचे कार्य सुरळीत चालू राहण्यासाठी पाणी पिणे गरजेचे असते. आपल्या मेंदूचा ९०% भाग हा पाण्याने बनलेला असल्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत चालू राहण्यासाठी पाणी पिणे आवश्यक असते. पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखी सुरु होते. जर आपण कमी पाणी पित असाल, तर आपल्याला डोकेदुखीचा त्रास जाणवेल. त्यामुळे डोकेदुखी थांबवायची असेल तर भरपूर प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे. 

५. आळस - सुस्ती दूर होते :- सकाळी झोपेतून उठल्या उठल्या एक ग्लास पाणी पिण्यामुळे आळस व सुस्ती दूर होते. सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी पाणी पिण्यामुळे आपल्या शरीरातील मेटाबॉलिज्मचा वेग वाढण्यास व त्याचे कार्य सुरळीत सुरु राहण्यास मदत होते. यामुळे दिवसभर काम करण्यासाठी आपल्याला जी ऊर्जा लागते ती व्यवस्थित आपल्याला मिळते. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास पाणी पिणे गरजेचे असते. 

मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...

६. निरोगी हृदयासाठी :- हृदय निरोगी ठेवण्यासाठी पाणी पिणे खूप गरजेचे असते. पाणी प्यायल्याने हृदयातील रक्ताभिसरण चांगले राहते. याशिवाय हृदयाच्या सर्व कक्षांमध्ये ऑक्सिजन आणि रक्ताभिसरण सुरळीत राहते. यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्सपाणी