निरोगी आणि उत्तम आयुष्य जगण्यासाठी व्यायाम आणि आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे. मुख्य म्हणजे तिशीनंतर खांद्यावर खूप मोठी जबाबदारी असते. या काळात लग्न, पालकत्व, नोकरी आणि घरातील कामात आपण इतके व्यग्र होतो, की स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्या शरीराला उर्जा तर लागतेच, शिवाय शरीर सुदृढ हेल्दी राहणं देखील गरजेचं आहे. तिशीनंतर गंभीर आजारांचा धोका वाढतो.
मधुमेह, बीपी, थायरॉईड, थकवा, अशक्तपणा, लठ्ठपणा, हृदयविकार इत्यादी आजारांना आपण बळी पडतो. गंभीर आजार आपल्याला होऊ नये, असे वाटत असेल तर, आहारात काही हेल्दी पदार्थांचा समावेश करा(6 Eating Changes You Should Make When You Turn 30).
यासंदर्भातील माहिती देताना पोषणतज्ज्ञ शिखा अग्रवाल सांगतात, 'असे अनेक शाकाहारी पदार्थ आहेत, ज्यांच्या सेवनाने शरीराला लोह, कॅल्शियम, प्रथिने यांसारखे सर्व पोषक घटक मिळू शकतात. जर आपण तिशीत पदार्थ करत असाल तर, या पदार्थांचा आजपासून सेवन करण्यास सुरुवात करा.'
हिवाळ्यात १० मिनिटांत करा आंघोळ, जास्त वेळ लागला तर रक्तप्रवाहात अडथळे, डॉक्टर सांगतात..
हिरवे पालेभाज्या
पालक, केळी आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात. जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. शिवाय ऋतूतील व्हायरल इन्फेक्शनपासून सरंक्षण करतात.
सुकामेवा
उत्तम आरोग्य राखण्यासाठी तज्ज्ञ सुकामेवा खाण्याचा सल्ला देत असतात. सुकामेवा खाल्ल्याने त्यातून शरीराला ओमेगा -३ फॅटी ऍसिडस्, फायबर आणि प्रथिने मिळतात. जे हृदय आणि मेंदूच्या आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतात.
कडधान्य
क्विनोआ, ब्राऊन राईस, ओट्स आणि बार्ली हे धान्य कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि उर्जा प्रदान करणारे पदार्थ आहेत. शिवाय यामुळे पचन देखील सुधारते. शिवाय कडधान्यांमध्ये फॅट्स कमी पण प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. हे पदार्थ स्नायूंचा विकास आणि बळकट करण्याचे काम करतात. याशिवाय अतिरिक्त वजन कमी करण्यासही मदत करतात.
डेअरी प्रॉडक्ट्स
ग्रीक योगर्ट, पनीर किंवा फोर्टिफाइड वनस्पती-आधारित पर्याय जसे बदाम दूध किंवा सोया दूध हाडांच्या आरोग्य राखण्यास मदत करतात. शिवाय हे पदार्थ कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी प्रदान करतात.
रोज ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने आजार पळतात की छळतात? वजनही वाढते? कधी -किती सुकामेवा खावा?
रंगीत भाज्या आणि फळे
सिमला मिरची, गाजर, ब्रोकोली आणि टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात. जी रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. यासह त्यातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात. बेरी, लिंबूवर्गीय फळे, सफरचंद आणि केळी विविध जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स प्रदान करतात. ज्यामुळे आरोग्य सुदृढ राहते.
हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत
एवोकॅडो, ऑलिव्ह ऑईल आणि फ्लॅक्ससीड ऑइल हे मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्सचे उत्तम स्रोत आहेत, जे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि मेंदूच्या कार्यास मदत करतात.