अक्कलदाढ खूप दुखते आहे, तसेच दात ठणकू लागला रात्री - बेरात्री तर काय करायचे?
दात ठणकायला लागला तर तातडीने डॉक्टरला खरंतर दाखवायला हवा. मात्र अनेकदा रात्री बेरात्री ठणक लागला तर काय करायचं असा प्रश्न पडतो. सुंदर, मजबूत व पांढरेशुभ्र दात आपले सुद्धा हवे अशी प्रत्येकाची इच्छा असतेच. असे असले तरीही दातांमध्ये वेदना (Toothache) होणे ही एक सामान्य समस्या आहे ज्यामुळे अनेक लोक त्रस्त असतात. अनेकदा आपण ही समस्या लहान आहे, साधी दातदुखी तर आहे म्हणून याकडे दुर्लक्ष करतो. परंतु खरंच असे करणे खूप गंभीर ठरू शकते. कारण ही एवढीशी समस्या कधी हाताबाहेर जाऊन त्याचा आपल्याला मोठा फटका बसेल हे सांगता येत नाही. दातदुखी सारखी अगदी लहान वाटणारी आणि सहन न करता येणारी वेदना दुर्लक्ष केल्याने किती महाभयंकर रूप घेऊ शकते हे त्या वेदनेतून जाणारा व्यक्तीच सांगू शकतो. यासाठी वेळीच या वेदनेकडे लक्ष देऊन उपचार करणे गरजेचे आहे.
दातांच्या आत एक पल्प असतो जो मज्जातंतू नर्व टिश्यूस आणि रक्तवाहिन्यांनी भरलेला असतो. या पल्पच्या नसा आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील असतात. जेव्हा या नसांना बॅक्टेरियाचा संसर्ग होतो तेव्हा त्यात तीव्र वेदना होतात. यामुळे दातदुखी होऊ शकते. अचानक दात दुखीचा (Toothache) अनुभव आपल्यापैकी बहुधा सर्वांनाच कधीतरी येतो. साधारणपणे दात किडल्याने दातदुखी उद्भवते. आहार, बदलती जीवनशैली यासारख्या कारणांसह मानसिक ताणतणावांमुळेही दातांचे आरोग्य बिघडत असल्याचे लक्षात आले आहे. अशावेळी दुखणे कमी करण्याचे नैसर्गिक घरगुती उपाय माहीत असलेले केव्हाव्ही उत्तम ठरते(6 Best Home Remedies For Toothache That Actually Work).
अशावेळी काय करावे?
१. गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या करा :- मीठ हे नैसर्गिक जंतूनाशक आहे. कोमट पाण्यात मीठ मिसळून त्या पाण्याने गुळण्या केलास दातांमधील वेदना दूर होतात. दातदुखीसाठी डॉक्टर कडे गेल्यावर डॉक्टरसुद्धा प्राथमिक उपाय म्हणून मिठाच्या गुळण्या करण्याचा सल्ला देतात. या छोट्याशा उपायामुळे अनेकदा खूप मोठा फरक पडतो. यासाठी मीठ घातलेले कोमट पाणी तोंडात घेऊन काहीवेळ तोंडात ठेवून गुळण्या कराव्यात आणि मग थुकून द्यावे. असे दिवसातून ४ ते ५ वेळा करावे.
पाणी चुकीच्या रीतीने प्यायल्यानेही होते अपचन, पहा पाणी नेमके कसे प्यावे, केव्हा प्यावे ?
२. बेकिंग सोड्याची पेस्ट :- दातांच्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठू बेकिंग सोडा सुद्धा आपल्याला मदत करू शकतो. हा उपाय करताना आपल्या नेहमीच्या टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा मिसळून त्याची पेस्ट तयार करावी, आणि थेट जो दात दुखतो आहे त्या जागी लावावी. यामुळे अगदी काहीच मिनिटांत आपला दुखणारा दात दुखायचा थांबेल. याचबरोबर आपल्या वेदना देखील कमी होतील. हा अगदी साधा सोपा उपाय वाटत असला तरी खूप जास्त रामबाण आहे.
पावसाळ्यात वारंवार होणाऱ्या अपचन, गॅसेसच्या त्रासाने हैराण ? १० उपाय पावसाळ्यात पचन राहील चांगले...
३. टी बॅग :- दातदुखीमुळे होणाऱ्या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चहाच्या टी बॅग्सचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. चहाच्या उबदारपणामुळे सूज कमी होण्यास मदत होते, तर ती बॅग थेट दुखणाऱ्या दातावर लावल्याने वेदना बऱ्याच अंशी कमी होतात. चहामध्ये असलेले टॅनिक अॅसिड जळजळ कमी करण्यास मदत करते.
४. लवंग व लवंग तेल :- दातदुखीसाठी लवंगांचा वापर तर आपल्याकडे अगदीच कॉमन उपाय आहे. दात दुखी सुरु झाली की पहिला उपाय हा लवंग वापरण्याचा सांगितला जातो. लवंग मध्ये अँटीबॅक्टीरियल आणि अँटीसेप्टिक गुण असतात जे इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतात. ज्या ठिकाणी जास्त वेदना होत आहेत त्यावर लवंग तेलाचे काही थेंब लावून मालिश केल्याने बराच आराम पडतो. याशिवाय दुखत असलेल्या दातामध्ये आपण अख्खी लवंगही ठेऊ शकता. काही वेळातच दात दुखी कमी होण्यास मदत मिळते.
सकाळी उठल्या उठल्या करा ३ गोष्टी, वजन होईल झरझर कमी-तब्येत एकदम फिट...
५. आलं :- दातदुखी थांबविण्यासाठी आल्याचा वापरही खूप गुणकारी ठरतो. यासाठी लवंगेप्रमाणेच आल्याचा वापर करावा. आल्याचा लहानसा तुकडा दुखऱ्या दाताखाली, दाढेखाली ठेवून चावावा. २० ते २५ मिनिटे तसाच ठेवावा. नंतर कोमट पाण्याने खळखळून चूळ भरावी, यामुळे ठणकणारा दात दुखायचा थांबतो.
६. पेरूची पाने :- दातदुखीवर एक उत्तम उपाय म्हणजे पेरुची पाने. पेरूच्या पानांमध्ये असणारे घटक दातांचं आणि एकंदरीतच तोंडाचं आरोग्य सांभाळण्यासाठी उपयुक्त ठरतात. पेरुच्या पानांमध्ये अँटिमायक्रोबियल, अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. दातदुखी थांबविण्यासाठी ते उपयुक्त ठरतात. पेरूची पाने धुवून पाण्यात टाका त्यात थोडे मीठ घाला. हे पाणी उकळून थंड झाल्यावर या पाण्याने गुळण्या करून मग या पाण्याचा वापर करून दात स्वच्छ घासून घ्यावेत. हा उपाय दिवसातून २ ते ३ तीन वेळा करावा. त्यामुळे दुखत्या दातांना बराच दिलासा मिळेल व हिरड्यांचे आरोग्य सुधारण्यास याची मदत होईल.
वरील सगळे उपाय दातांची ठणक तात्पुरती थांबवू शकतात. हे उपाय करूनही जर दातदुखी थांबत नसेल तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.