Join us   

ऐन तारुण्यात गुडघे दुखतात, गुडघ्यांमधून कडकड आवाज येतो? ६ गोष्टी खा, कॅल्शियमची कमतरता होईल दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2023 5:10 PM

6 Food Sources Of Calcium For Your Bones तरुणपणीच गुडघे दुखतात. कॅल्शियमच्या गोळ्या घ्याव्या लागतात, आहार बदला कारण..

शरीराचा संपूर्ण भार हाडांच्या संरचनेवर असतो. त्यामुळे हाडे मजबूत आणि निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु, वयानुसार हाडे ठिसूळ होतात. त्यासाठी आहारात कॅल्शियमचा समावेश असणं गरजेचं आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्याच्या निगडीत समस्या उद्भवू शकतात.

मुख्य म्हणजे हाडे कमकुवत होतात. ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढू शकतो. यासह दात, हृदय, मज्जासंस्थेच्या कार्यात बाधा, व रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होणे, या समस्या निर्माण होतात. हाडांना मजबुती मिळावी यासाठी होलिस्टिक न्यूट्रिशनिस्ट प्रियांशी भटनागर यांनी काही कॅल्शियमयुक्त पदार्थांबद्दल माहिती दिली आहे(6 Food Sources Of Calcium For Your Bones).

हाडांना मजबुती मिळावी यासाठी खा ५ कॅल्शियमयुक्त पदार्थ

दूध व दुधापासून तयार पदार्थ

दूध व इतर दुग्धजन्य पदार्थ जसे की, दही, पनीर, चीज, लस्सी, ताक यांचा आहारात समावेश करा. या पदार्थांमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. नियमित हे पदार्थ खाल्ल्यास हाडांना मजबुती मिळेल.

बाजारात मिळते ते पाकिटबंद ज्यूस पिणे आरोग्यासाठी का त्रासदायक? आहारतज्ज्ञ सांगतात १० धोके

पांढरे तीळ

तीळ हे कॅल्शियमचे उत्तम स्त्रोत आहे. १ चमचे तिळात सुमारे ८८ मिलीग्राम कॅल्शियम आढळते. आपण पांढऱ्या तिळाचा वापर सॅलड्स, ब्रेड आणि इतर पदार्थांमध्ये करू शकता.

हिरव्या पाले भाज्या

हिरव्या पाले भाज्यांमध्ये पौष्टीक घटक यासह कॅल्शियम आढळते. याशिवाय यामध्ये लोह आणि फायबरचे प्रमाणही जास्त असते, ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुधारते. आपल्या आहारात पालक, मेथी, इत्यादी भाज्यांचा समावेश करा.

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त आढळते. याशिवाय हे अँटीऑक्सिडंट्सचाही चांगला स्रोत आहे. त्यामुळे आहारात या भाजीचा समावेश करा.

झटपट वजन कमी करायचंय? ५ गोष्टी करा - जिम लावायची गरज नाही इतका वाढेल फिटनेस

बदाम

प्रथिने आणि निरोगी चरबी व्यतिरिक्त बदामामध्ये कॅल्शियम देखील असते. बदामाचे सेवन केल्याने हृदय आणि मन निरोगी राहते. हाडे मजबूत करण्यासाठी दररोज भिजवलेले बदाम खा. याशिवाय बीन्स, ऑरेंज, चीज, टोफूमध्ये देखील कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळते.

खजूर

खजूरमध्ये कॅल्शियम व्यतिरिक्त जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळते. जर आपल्याला वारंवार थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर, दिवसातून किमान तीन खजूर खावे.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य