Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दररोज मुठभर भाजलेले चणे खाण्याचे ६ फायदे, फक्त स्नॅक्स म्हणून खाऊ नका - आनंदाने खा पोटभर

दररोज मुठभर भाजलेले चणे खाण्याचे ६ फायदे, फक्त स्नॅक्स म्हणून खाऊ नका - आनंदाने खा पोटभर

6 Health and Nutrition Benefits of Chickpeas फायबर - प्रोटीनचा खजाना म्हणजे भाजलेले चणे, बॅड कोलेस्टेरॉलसह वजनही होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2023 10:30 AM2023-09-11T10:30:50+5:302023-09-11T11:02:15+5:30

6 Health and Nutrition Benefits of Chickpeas फायबर - प्रोटीनचा खजाना म्हणजे भाजलेले चणे, बॅड कोलेस्टेरॉलसह वजनही होईल कमी

6 Health and Nutrition Benefits of Chickpeas | दररोज मुठभर भाजलेले चणे खाण्याचे ६ फायदे, फक्त स्नॅक्स म्हणून खाऊ नका - आनंदाने खा पोटभर

दररोज मुठभर भाजलेले चणे खाण्याचे ६ फायदे, फक्त स्नॅक्स म्हणून खाऊ नका - आनंदाने खा पोटभर

भारतीय लोक स्नॅक्स म्हणून भाजलेले चणे खातात. भाजलेले चणे खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. काही लोकं छोटी भूक भागवण्यासाठी चणे खातात. मात्र, चणे हे फक्त चवीपुरते किंवा भूक भागवण्यासाठी मर्यादित नसून, आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. भाजलेल्या चण्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन वाढत नाही. भाजलेल्या चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आर्यन, फायबर आणि व्हिटामिन असते. ज्यामुळे शरीराला काम करण्याची उर्जा तर मिळतेच, सोबत अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा सांगतात, 'दररोज मुठभर भाजलेले चणे खाल्ल्याने शरीराला अनेक पौष्टिक घटक मिळतात. आपण चणे शिजवून किंवा भाजून खाऊ शकता. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, त्यांनी दररोज मुठभर भाजलेले चणे खावे'(6 Health and Nutrition Benefits of Chickpeas).

भाजलेले चणे म्हणजे प्रोटीनचा भांडार

चण्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. आपण काळे चणे भाजून किंवा शिजवून खाऊ शकता. शरीराला नवीन पेशींची दुरुस्ती आणि निर्मिती करण्यासाठी प्रथिनांची गरज असते. त्यामुळे लहान मुले, किशोरवयीन आणि गर्भवती महिलांना भाजलेले चणे खाण्याचा सल्ला दिला जातो.

दूध प्यायले नाही तर काय होईल? कॅल्शियमच्या कमतरतेव्यतिरिक्त शरीरात आणखी काय बदल घडतील?

वेट लॉस करण्यासाठी उपयुक्त

भाजलेल्या चण्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, 'फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. ज्यामुळे आपण उलट - सुलट पदार्थ खाणे टाळतो. याशिवाय फायबर पचन सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी उपयुक्त ठरते.

हाडांना देते मजबुती

एनसीबीआयमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, 'भाजलेल्या चण्यांमध्ये मॅंगनीज आणि फॉस्फरस आढळते. जे निरोगी हाडांचे आरोग्य राखण्यास मदत करतात. यासह हाडांच्या निगडीत असलेला त्रासही कमी होतो.'

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

भाजलेले चणे हे मॅंगनीज, फोलेट, फॉस्फरस आणि आयर्नचे समृद्ध स्त्रोत मानले जाते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. फॉस्फरस विशेषतः रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.

ब्लड शुगर राहते नियंत्रित

भाजलेले चणे हे फायबर आणि प्रोटीनचे उत्तम स्त्रोत आहे. यात फॅट्स कमी असते. याशिवाय चण्यांमध्ये आयर्न, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम असते. मॅंगनीज ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करते. तर, फॉस्फरस रक्तदाब नियंत्रित ठेवते. ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहते.

जेवल्यानंतर शतपावली करण्याचे ५ फायदे, जुनाट काहीतरी म्हणून नाक न मुरडता चालून तर पाहा..

बॅड कोलेस्टेरॉल करते कमी

भाजलेले चणे हे फायबरचे उत्तम स्त्रोत मानले जाते. दररोज मुठभर भाजलेले चणे खाल्ल्याने रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. यासह हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही कमी होतो.

Web Title: 6 Health and Nutrition Benefits of Chickpeas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.