Join us   

कोण म्हणतं मिठाईमुळे फक्त वजन वाढतं? या दिवाळीत बिनधास्त खा ६ प्रकारच्या मिठाई, आरोग्यासाठी उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2023 6:45 PM

6 Indian Desserts that have more proteins : खिरीपासून ते बेसनाच्या लाडूपर्यंत, ६ मिठाईंमध्ये असते भरगच्च प्रोटीन

प्रोटीन शरीरासाठी आवश्यक आहे. हे आपल्या शरीरातील पेशींच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. शिवाय शरीराला काम करण्यासाठी उर्जाही देतात. प्रोटीन स्नायू, त्वचा आणि हार्मोन्सना वाढविण्याचे काम करतात. प्रोटीन्सची कमतरता अधिक करून लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींमध्ये दिसून येते. ज्यामुळे आपल्याला थकवा, अंगदुखी तसेच सांधेदुखी जाणवू शकते.

सध्या दिवाळीचा सिझन सुरु आहे. या दिवसात मिठाई दाबून खाल्ली जाते. पण काही जण वजन वाढण्याच्या भीतीने खाणं टाळतात. प्रोटीन फक्त डाळी आणि भाज्यांमध्ये नसून, इतर मिठाईंमध्ये देखील असते. त्यामुळे यंदा वजन वाढण्याच्या भीतीने मिठाई खाणं टाळू नका, तर या ६ मिठाई आवर्जून खा(6 Indian Desserts that have more proteins).

बेसनाचा हलवा

बरेच जण दिवाळीत बेसनाचा दाणेदार हलवा तयार करतात. बेसनाचा हलवा चवीला तर उत्कृष्ट असतोच, शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. बेसनाचा हलवा तयार करताना त्यात बेसन म्हणजेच चणा डाळीच्या पिठाचा वापर केला जातो. चणाच्या डाळीत प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. शिव्या त्यात बदाम, अक्रोड आणि इतर ड्रायफ्रुट्स घातल्याने त्यातील प्रोटीनचे प्रमाण वाढते.

जेवताना पाणी प्यावे की जेवल्यानंतर? नक्की किती आणि कधी पाणी पिणं चांगल्या पचनासाठी योग्य ठरतं?

मिल्क केक

मिल्क केक पूर्णपणे दुधाचा वापर करून तयार करण्यात येतो. दूध हे प्रोटीनचे उत्तम स्त्रोत आहे. एका मिल्क केकच्या तुकड्यात ४३ ग्रॅम प्रथिने आढळते. त्यात खवा देखील मिक्स केला जातो, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

मिष्टी डोई

मिष्टी डोई ही एक बंगाली स्वीट डिश आहे. या गोड पदार्थामध्ये गुळाचा वापर केला जातो. मिष्टी डोईच्या एका सर्व्हिंगमध्ये सुमारे ७. ७८ प्रोटीन आढळते. शिवाय या स्वीट डिशमध्ये उत्कृष्ट प्रोबायोटिक असते. जे पोटासाठी फायदेशीर ठरते.

मूग डाळीचा हलवा

बऱ्याच जणांना मूग डाळीचा हलवा आवडतो. मूग डाळीत प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, आहारात मुग डाळीचा नक्कीच समावेश करा. एक वाटी हलव्यामध्ये २१२ कॅलरीज आणि ५ ग्रॅम प्रोटीन आढळते. त्यामुळे हिवाळ्यात तज्ज्ञ मूग डाळीचा हलवा खाण्याचा सल्ला देतात.

बेसनाचे लाडू

बेसनाच्या लाडूमध्ये फक्त प्रोटीन नसून गुड फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. एक बेसनाच्या लाडूमध्ये ६ ग्रॅम प्रथिने आणि २० ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. ज्यामुळे आपल्याला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते.

पाक न करता करा रव्याचे तोंडात विरघळणारे झटपट लाडू, लाडू बिघडण्याचं टेंशनच नाही..

खीर

खीर अनेक प्रकारची केली जाते. यात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे आपल्याला लवकर भूक लागत नाही. शिवाय त्यात कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. आपण खिरीमध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करू शकता. यामुळे खीर अधिक हेल्दी आणि पौष्टीक होते.

टॅग्स : दिवाळी 2023अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स