Join us   

कमजोर हाडांना पोलादी ताकद देतील ६ पदार्थ; कॅल्शियम, प्रोटीन भरपूर मिळेल-बळकट होतील हाडं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 12:11 PM

Non Dairy Calcium Rich Foods : हाडं  पोकळ होऊ लागतात आणि हाडांची रचना  खराब होते.

हाडं, नखं आणि सांध्याच्या मजबूतीसाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. पण अनेकांना दूध प्यायला आवडत नाही. ज्यामुळे शरीरारात कॅल्शियमची कमतरता उद्भवू शकते. कॅल्शियम (Calcium) हे एक अत्यावश्यक मिनरल आहे. हाडांच्या मजबूतीसाठी ते गरजेचे असते. (Non Dairy Calcium Rich Foods) याच्या कमतरतेमुळे बोन्स डेंसिटी कमी होऊ शकते. हाडं  पोकळ होऊ लागतात आणि हाडांची रचना  खराब होते. हे मिनरल्स मिळवण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. काही असे पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनाने तुम्हाला कॅल्शियम भरपूर मिळेल. (6 Non Dairy Calcium Rich Foods Other Than Milk To Increase Strength In Bones Joints)

खसखस

कॅल्शियमसाठी दुधाऐवजी खसखसचा आहारात समावेश करा. डाएटमध्ये खसखसचा समावेश केल्यानं १० पट अधिक कॅल्शियम मिळते. युएसडीच्या रिपोर्टनुसार १०० ग्राम खसखसमध्ये १४४० मिलीग्राम कॅल्शियम असते. जे शरीरासाठी पुरेसे ठरते. 

पोट सुटलंय-व्यायाम शक्यच होत नाही? रोज सकाळी चमचाभर या बीया खा, महिन्याभरात व्हाल बारीक

तीळ

रोज चमचाभर तीळ खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात असं म्हटलं जातं. यात अनेक मिनरल्स असतात (Ref). तिळात व्हिटामीन बी-१२, व्हिटामीन ई बरोबरच प्रोटीन्सही असतात. १ चमचा तिळात ८८ मिलीग्राम कॅल्शियम असते जे दुधापेक्षाही जास्त आहे. सॅलेड, डाळ किंवा चपातीबरोबर तुम्ही अख्खे तीळ किंवा तिळाची चटणी खाऊ शकता. 

आळशीच्या बीया

आळशीच्या बीया कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. एक औंस आळशीच्या बीयांमध्ये जवळपास  ७० ते८० मिलीग्राम कॅल्शियम असते. ज्यामुळे शरीर दुधापेक्षा जास्त ताकदवान  बनते.  

केस पांढरे झालेत? ना डाय ना हेअर कलर; 3 घरगुती उपाय करा, दाट-काळे होतील केस

चिया सिड्स

चिया सिड्समध्ये  भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. एक औंस चिया सिड्समध्ये जवळपास १८० ते २०० मिलीग्राम कॅल्शियम असते. यात फायबर्स मोठ्या प्रमाणात  असतात. चिया सिड्सच्या सेवनाने तुम्ही सहज वजन कमी करू शकता.

टोफू

जे लोक लॅक्टोजमुळे दूध पित नाहीत ते टोफूचे सेवन करू शकतात. टोफूमुळे हाडांना ताकद येते. एक कप टोफूमध्ये २०० ते ४०० मिलीग्राम कॅल्शियम असते. जे दुधापेक्षा अधिक प्रभावी आहे.

केल

केल एक हिरवी पालेभाजी आहे ज्यात भरपूर कॅल्शियम असते. एक कप शिजवलेल्या केलमध्ये १०० ते २०० मिलीग्राम कॅल्शियम असते. ही हिरवी पालेभाजी व्हिटामीन्स आणि मिनरल्सनी परिपूर्ण आहे. 

बदाम

बदामात कॅल्शियमबरोबरच प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असतात. एक मूठभर बदामात जवळपास ७० ते ८० मिलीग्राम कॅल्शियम असते. यात जिंक, कॉपर, मॅग्नेशियम यांसारखी पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीराला बरेच फायदे मिळतीत

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स