Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > घट्ट ब्रा चोवीस तास घालण्याचे आरोग्यावर होतात ६ गंभीर दुष्परिणाम, फॅशन आणि फिगरसाठी हा धोका पत्करणार का?

घट्ट ब्रा चोवीस तास घालण्याचे आरोग्यावर होतात ६ गंभीर दुष्परिणाम, फॅशन आणि फिगरसाठी हा धोका पत्करणार का?

Women's Health ब्रा घालण्याचे फायदेही आहेत, मात्र अतिरेक करुन खूप घट्ट ब्रा दिवसरात्र घालणं योग्य नाही कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2022 02:51 PM2022-11-22T14:51:00+5:302022-11-22T14:52:24+5:30

Women's Health ब्रा घालण्याचे फायदेही आहेत, मात्र अतिरेक करुन खूप घट्ट ब्रा दिवसरात्र घालणं योग्य नाही कारण..

6 Serious Health Effects of Wearing a Tight Bra 24/7, Is It Risking for Fashion and Figure? | घट्ट ब्रा चोवीस तास घालण्याचे आरोग्यावर होतात ६ गंभीर दुष्परिणाम, फॅशन आणि फिगरसाठी हा धोका पत्करणार का?

घट्ट ब्रा चोवीस तास घालण्याचे आरोग्यावर होतात ६ गंभीर दुष्परिणाम, फॅशन आणि फिगरसाठी हा धोका पत्करणार का?

घरातील कार्य असो वा पार्टी अनेक महिला फॅशनची खूप काळजी घेतात. मात्र  बऱ्याचदा परिधान केलेला ड्रेस  शोभून दिसत नाही कारण उत्तम फिटिंगची, योग्य आकार आणि मापाची ब्रा वापरलेली नसते. आजकाल विविध प्रकारच्या ब्रा बाजारात उपलब्ध आहेत. विशिष्ट ड्रेसवर परिधान करण्यासाठी त्यातून योग्य ब्रा निवडायला हवी. ब्रामुळे परिधान केलेला ड्रेस उत्तम तर दिसतोच पण स्तनाचे आरोग्य आणि शेपसाठी योग्य मापाची ब्रा घालणे खूप महत्वाचे आहे. ब्रा घातल्याने फिगर सुंदर आणि शेपमध्ये दिसते. पण तसे दिसावे म्हणून  टाईट ब्रा घालणं अयोग्य. तसेच काहीजणी तर चोवीस तास ब्रा घालून राहतात, त्याचेही परिणाम आरोग्यावर होतात. त्यामुळे आरोग्याचा विचार करुन ब्रा ची निवड करायला हवी. तसे केले नाही तर काही त्रास उद्भवू शकतात.

रॅशेस

२४ तास ब्रा घातल्याने त्याचा परिणाम स्तनाच्या स्कीनवर होते.  त्वचेवर लाल डाग येणे किंवा त्या भागात खाज येणे, जळजळ होणे सुरु होते. बहुतेकवेळा स्कीनवर इन्फेक्शन होते. त्यामुळे रात्री ब्रा घालून झोपणे योग्य नाही. रक्ताभिसरणावरही त्याचा परिणाम होतो. स्नायू दुखावू शकतात.  तसेच वायर मटेरिअल किंवा सतत, जास्त वेळ टाइट स्पोर्ट्स ब्रा घातल्यानेही स्तनाच्या स्नायूंना अपाय होऊ शकतो. 

वेदना

सतत ब्रा घातल्याने वेदना होणं साहजिक आहे. जसे खूप टाईट कपडे घातल्यावर शरीराला अस्वस्थता वाटते तसेच स्तनांनापण वाटते. यामुळे त्वचा मोकळा श्वास घेऊ शकत नाही आणि त्वचेचे रोग होण्याची शक्यता वाढते.

ॲसिडीटीचा त्रास होतो?

ब्राचा खालचा पट्टा खूप टाइट असेल, तर छातीत जळजळ होते, ॲसिडिटी, आंबट ढेकर येणे असे त्रास होत असतील तर आपली ब्रा साइज तपासा.

ब्रेस्ट पेन

फिटिंग आणि लहान आकाराच्या ब्रा घातल्यामुळे स्तन दुखण्यास सुरुवात होते. त्यामुळे २४ तास ब्रा घालणे बहुतेकदा टाळावे. ज्या महिलांचे स्तन हे आकाराने मोठे असतात. त्यांना याचा अधिक त्रास होतो.

बॅक्टेरिया

२४ तास ब्रा घातल्याने त्वचा स्वच्छ राहत नाही. त्या भागात घाम आल्याने फंगस किंवा जंतूसंसर्गही होऊ शकतो.

आकारात बदल

सतत ब्रा घातल्यामुळे स्तनांना शेप येत असला, तरी २४ तास ब्रा घातल्यामुळे शेप बिघडू देखील शकतो. आपल्या ब्राचा साइज योग्य असला पाहिजे. जेणेकरून शेप बिघडणार नाही.

Web Title: 6 Serious Health Effects of Wearing a Tight Bra 24/7, Is It Risking for Fashion and Figure?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.