Join us   

तुम्ही गरजेपेक्षा जास्त साखर खात आहात, शरीर देते ६ संकेत; दुर्लक्ष केलं तर ' ही ' शिक्षा अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2024 3:41 PM

6 signs you're eating too much sugar and it's time to stop : शरीर देतं ६ संकेत आपण जास्त प्रमाणात साखर खात आहात..

अनेकांना खूप गोड खाण्याची सवय असते. पण अतिगोड खाण्याचेही काही तोटे आहेत (Health Tips). गोड पदार्थांमुळे वजन वाढतं. शिवाय मधुमेह यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते (Sugar Cutting). पण अनेकदा आपल्याला कळून येत नाही आपण किती प्रमाणात साखर खात आहोत. आहारात जास्त प्रमाणात साखर असेल तर, शरीरात काही विशेष बदल दिसून येतात.

ॲक्ने, अशक्तपणा, उच्च रक्तदाब, वजन वाढते यासह पोटाचे अनेक विकारही छळतात. जर आपल्याला आपण जास्त प्रमाणात साखर खात आहोत की नाही, हे समजून घ्यायचं असेल तर, शरीरातील ६ बदलांकडे दुर्लक्ष करू नका, आणि वेळीच आहारातून साखर वगळा(6 signs you're eating too much sugar and it's time to stop).

शरीरात साखरेचं प्रमाण वाढल्यावर शरीर देते ६ संकेत

- जास्त प्रमाणात साखरेचे पदार्थ खाल्याने विशेषत: सुक्रलोजमुळे, पोटाभोवती व्हिसेरल फॅट वाढू लागते. ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढते.

अळूच्या पानांची भजी करून पाहिली आहे का? कुरकुरीत भजी खाल तर कांदा - बटाट्याची भजी विसराल

- साखरयुक्त पदार्थ आणि पेयांमध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त असते. यामुळे पोट भरत नाही, आणि वारंवार भूकही लागते.

- साखर अधिक प्रमाणात खाल्ल्याने इन्शुलीनची पातळी वाढते. ज्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागते. आणि अशा स्थितीत आपण ओव्हरइटिंग करतो. ज्यामुळे वजन झपाट्याने वाढते.

- अधिक प्रमाणात साखर खाल्ल्याने आपल्याला स्नॅकिंगची इच्छा होते. साखरयुक्त पदार्थ आणि शरीरात कॅलरीजमुळे वजन वाढते.

अक्षय कुमार उठल्यानंतर करतो १ 'खास' काम; पन्नाशीतही तंदुरुस्त राहायचं असेल तर..

- अतिप्रमाणात साखर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी बदलते, ज्यामुळे शरीर स्वतःला स्थिर करण्याचा प्रयत्न करत असताना जास्त प्रमाणात खाणे होते.

- साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आपल्याला थकवा जाणवू शकतो, आणि आळसही वाढतो. ज्यामुळे वजनही वाढते, आणि प्रोडक्टिविटीही कमी होते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य