Join us   

डायबिटिस असल्याने आइस्क्रीम खाता येत नाही, सरबतं नको? मनसोक्त प्या ६ हटके ड्रिंक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2023 4:53 PM

6 Summer Drinks For Sugar Patients to Control Blood Sugar : उन्हाळ्यात गारेगार खावंसं वाटतं पण गोड नको, त्यासाठीच प्या हे ६ ड्रिंक्स- शुगर वाढणार नाही

उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला खूप गरम होतं, त्यामुळे अंगाची सतत लाहीलाही होते. अशावेळी आपण बाजारात मिळणारी शीतपेय, ज्यूस, सरबतं, आईस्क्रीम, कुल्फी यांसारख्या गोष्टींचे जास्त प्रमाणात सेवन करतो. यामुळे गारेगार वाटण्यास मदत होते. मात्र शुगर असणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यासाठी हे अजिबात चांगले नसते. यामध्ये असलेली साखर आणि इतर प्रिझर्व्हेटीव्ह यांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि ते डायबिटीस असणाऱ्या रुग्णांसाठी घातक असते. मात्र उकाड्याने लाहीलाही होत असताना काहीतरी गार हवे असते. मात्र गार म्हटल्यावर या गोष्टी घेण्यापेक्षा शुगर असणाऱ्या व्यक्ती घेऊ शकतात अशी काही खास पेय आज आपण पाहणार आहोत. आयुर्वेदिक आणि डायबिटीस आहारतज्ज्ञ असलेल्या शिवानी फोतेदार यांनी ही पेय सुचवली असून ती कोणती ते पाहूयात (6 Summer Drinks For Sugar Patients to Control Blood Sugar)...

१. बदामाचं दूध

यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण न वाढता त्यातून शरीराला अतिशय उपयुक्त असे घटक मिळतात. तसेच यामध्ये प्रोटीन, फायबर आणि उपयुक्त असे फॅटस असतात त्यामुळे हे दूध प्री डायबिटीक आणि टाईप २ डायबिटीस असणाऱ्या रुग्णांसाठी उपयुक्त असते. 

(Image : Google)

२. नारळाचं दूध 

नारळाच्या दुधाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे डायबिटीस असणाऱ्या रुग्णांसाठी हा उत्तम पर्याय आहे. त्यामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स आणि इलेक्ट्रोलाईटस जास्त प्रमाणात असल्याने ते आरोग्यासाठी उपयुक्त असते. हे दूध बाजारात उपलब्ध होते तसेच घरातही करता येते. यातील फायबरमुळे पदार्थांतील स्टार्च ग्लुकोजमध्ये रुपांतरीत करण्याची क्रिया कमी वेगाने होत असल्याने हे दूध फायदेशीर ठरते 

३. हिरव्या सफरचंदाचा ज्यूस 

सफरचंद हे अतिशय उपयुक्त फळ आहे. या फळाच्या सालात एक बायोअॅक्टीव्ह घटक असतो. तो रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त असतो. उन्हाळ्यात न चुकता रोज हा ज्यूस घेतला तर रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. तसेच ज्यूस प्यायल्याचेही समाधान होते. 

४. चिया सीडस आणि स्ट्रॉबेरी स्मूदी 

चिया सीडसमध्ये फायबर आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात तसेच विविध प्रकारची खनिजेही त्यातून शरीराला मिळतात. तसेच स्ट्रॉबेरीमध्येही व्हिटॅमिन सी आणि खनिजांचा साठा असतो. यामुळे अँटीऑक्सिडंटस आणि शरीरातील गुंतागुंत कमी करण्यास मदत होते. 

५. कोकम सरबत 

कोकममध्ये अँटीऑक्सिडंटस आणि अँटीडायबिटीक गुणधर्म असतात. यामुळे शरीरातील काही एंझाईम्स चांगले होण्यास मदत होते. डायबिटीस असणाऱ्या रुग्णांमध्ये याचे प्रमाण कमी असते. मात्र हे प्रमाण कोकममुळे वाढल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

६. सातूचं सरबत 

सातूच्या पीठात बिटा ग्लुकन असा पदार्थ असतो जो रक्तातील साखर आणि ग्लुकोज कमी करण्यासाठी उपयुक्त असतो. सातूच्या पीठातून फायबर, प्रोटीन मिळते आणि अँटीऑक्सिडंट म्हणून काम करत असल्याने डायबिटीसच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर असते. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने तो उपयुक्त असतो. 

 

 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलसमर स्पेशल