Join us   

सारखे गोड खावेसे वाटते? बिनधास्त खा ६ फळे, गोड खाणेही होईल, तब्येतही ठणठणीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2023 4:36 PM

6 Sweet Fruits To Satisfy Your Sugar Cravings Naturally : गोड खाण्याची इच्छा झाली परंतु साखरेचे प्रमाण वाढण्याची काळजी वाटते, खा ६ फळ,फळांतून मिळेल नैसर्गिक साखर...

बरेचदा आपल्याला जेवणानंतर काहीतरी गोड खायची इच्छा होते. अशावेळी आपण चॉकलेट, आईस्क्रीम, किंवा इतर गोड पदार्थ खाणे पसंत करतो. गोड पदार्थ हा अनेकांसाठी वीक पॉईंट असतो. एरवी गोडावर ताव मारणं वेगळं पण काहींना रोजची कामं करत असताना अचानक काहीतरी गोड खावसं वाटतं. कधीतरी कामाचा ताण घालवण्यासाठी, कधी जेवण झाल्यावर किंवा काहींना तर अगदी रात्री झोपतानाही काहीतरी गोड खाऊन झोपण्याची सवय असते. गोड आवडणं ठिक आहे पण सतत गोड खायची इच्छा होत असेल तर मात्र त्यामागे काही नेमकी कारणं असू शकतात, वेळीच या कारणांचा शोध घ्यायला हवा. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सतत गोड खाल्ल्याने लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. तसेच डायबिटीस, दाताचे विकार यांसाठीही गोड खाणे चांगले नसते. 

आपल्याला गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली की आपण लगेच काहीतरी गोड पदार्थ खातो परंतु वारंवार असे केल्याने आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढून त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतात. त्यामुळे गोड पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स जरी होत असले तरीही अति साखर असलेले कृत्रिम गोड पदार्थ खाण्यापेक्षा नैसर्गिक साखर असलेले पदार्थ खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने केव्हाव्ही उत्तमच राहील. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, गोड पदार्थ खाण्याची इच्छा जरी झाली तरीही साखरेचे पदार्थ न खाता अशा काही गोड फळांची यादी दिली आहे की, आपण गोड खाण्याची इच्छा झाल्यावर ही फळ खाऊ शकतो. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते जी आपल्या शरीराला हानिकारक नसते. त्यामुळे गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यावर नेमकी कोणती फळ खावीत हे पाहूयात. ही फळ खाल्ल्याने आपली गोड खाण्याची इच्छा पूर्ण तर होईलच सोबतच शरीरात साखरेचे प्रमाण वाढण्याची भीतीदेखील राहणार नाही(6 Sweet Fruits to Help Satisfy Your Sugar Craving Naturally). 

गोड खाण्याची इच्छा झाल्यावर नेमकी कोणती फळं खावीत ? 

१. आंबा (Mango) :- आंब्यांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण हे इतर फळांपेक्षा सर्वात जास्त असते. आंब्यांमध्ये फायबर आणि विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. तसेच आंब्यात जीवनसत्त्वे सी, ए, ई आणि के, बी यांचा समावेश अधिक असतो. दिवसभरात एक आंबा खाल्ल्याने आपल्याला उत्साही आणि आनंदित वाटते. कोणत्याही वेळी गोड पदार्थ खाण्याची इच्छा आणि वारंवार होणारे मूड स्विंग यांसारख्या समस्या नियंत्रणात ठेवण्याचे काम आंबा करते. 

व्यायाम केल्यानंतर कोणते हेल्दी ड्रिंक पिणे फायद्याचे? भाग्यश्री सांगते तिचे खास सिक्रेट ड्रिंक....

२. पेर (Pear):- नियमितपणे पेर (नाशपती) खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यात मदत होते. जेव्हा आपल्याला अचानकपणे वेळी - अवेळी काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते तेव्हा आपण पेर आवडीने खाऊ शकतो. कारण पेर हे एक स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी चांगले असे फळ मानले जाते. पेरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, पेर खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते आणि शरीराचे वजन आणि रक्तातील साखर नियंत्रित होते.

३. कलिंगड (Watermelon) :- कधीही गोड खाण्याची इच्छा झाली तर आपण कलिंगड खाऊ शकता. कलिंगडमध्ये पाणी आणि नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असते. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास हे उपयुक्त ठरते. कलिंगडमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. तसेच यामध्ये नैसर्गिक साखर देखील भरपूर प्रमाणात असते म्हणूनच जेवणानंतर किंवा अवेळी काही गोड खाण्याची इच्छा झाली की कलिंगड खावे. 

घोट - घोट पाणी पिण्याचा आहे खास नियम, लठ्ठपणा ते डिहायड्रेशन पर्यंतच्या समस्या होतील दूर...

४. टरबूज (Muskmelon) :- टरबूज हे देखील कलिंगडाप्रमाणेच पाणीदार असते. टरबूजमध्ये देखील पाण्याचे प्रमाण अधिक असते. टरबूजमध्ये कमी कॅलरीज असून ते खाण्यासाठी अतिशय गोड असते. टरबूज हे फळ उन्हाळ्यातील उष्णतेवर मात करण्यास आणि गोड खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरते. दररोज टरबूज खाल्ल्याने देखील आपले वजन कमी होण्यास मदत होते. 

५. पेरू (Guava) :- नियमितपणे पेरू खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. पेरू या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. पेरूमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने आपले पोट जास्त काळासाठी भरलेले राहते आणि यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. तसेच आपल्याला गोड खाण्याची इच्छा झाली की आपण पेरू हे फळ खाऊ शकतो. 

६. बेरीज (Berries Fruit) :- ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी आणि रासबेरी ही काही सर्वोत्तम फळ आहेत जी आपल्याला गोड खाण्याची इच्छा झाल्यावर आपण खाऊ शकता. ही फळ कमी-ग्लायसेमिक फळे असल्यामुळे, रक्तातील साखर न वाढवता भरपूर गोडवा देतात आणि आपली गोड खाण्याची इच्छा पूर्ण करतात.

ग्रीन टी पिताना हमखास ५ चुका करताय? वजन तर कमी होणारच नाही उडेल झोप, बिघडेल तब्येत...

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य