जंत होणे ही आपल्या देशातील महत्वाची समस्या आहे. माणूस खातो त्यातले बरेच अन्न त्याच्या पोटातले जंत खाऊन टाकतात. त्यामुळे अनेकांना अशक्तपणा, पोट फुगणे, उलट्या होणे अशा समस्या उद्भवतात. जंतांचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक मुख्यत: पचनसंस्थेत वाढणारे तर दुसरे यकृत, स्नायू वगैरे इतर ठिकाणी वाढणारे. पण सर्वसाधारणपणे पचनसंस्थेत वाढणा-या जंतांनाच जंत म्हणण्याची पध्दत आहे. एम्सच्या डॉक्टरांच्या मते, हे छोटे किडे शरीरातील सर्व रक्त शोषू शकतात. ज्यामुळे इतर आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासंदर्भात दिल्ली एम्सचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रियंका शेरावत म्हणतात, ''जर आपल्या आतड्यात जंत तयार होत असतील तर, शरीरात काही बदल दिसू लागतात. ज्यामध्ये शरीराला अन्न न लागणे, जेवताना पोट फुगणे, उलट्या होणे, कुपोषण आदींचा समावेश होतो.''
सीडीसीच्या मते, आतड्याच्या त्या भागातून रक्तस्त्राव होतो. जेथे आतड्यांतील जंत जोडलेले असतात. त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासते, यासह त्वचा पिवळी पडू लागते.
शरीरात प्रोटीनची कमतरता भासते
जंताचे अनेक प्रकार आहेत. त्यातील हुकवर्म्स हा देखील आतड्यांतील कृमीचा एक प्रकार आहे. हुकवर्मचा संसर्ग झाल्यावर शरीरात प्रोटीनची कमतरता भासते. त्यामुळे व्यक्तीचे वजन अचानक कमी होऊ लागते. मोठे जंत (गोल जंत), लहान जंत (कृमी) हे लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. अशी मुले लवकर अशक्त पडतात. यासह लवकर दमतात.
शरीराला जेवलेले अन्न लागत नाही
एम्सच्या डॉ. प्रियंका सांगतात, ''शरीराला अन्न न लागण्याचे अनेक कारणे आहेत. त्यातील मुख्य कारण म्हणजे, आतड्यात जंत अन्नातील पोषण खेचून घेतात. त्यामुळे शरीराला पौष्टीक घटक मिळत नाही.''
पपईच्या बिया करतील औषध म्हणून काम
पपईचा वापर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपण आतड्यातील जंत दूर करण्यासाठी पपईच्या बियांचा वापर करु शकता. काही लोक कच्च्या बिया खाऊन किंवा मधात मिसळून जंत मारण्याचा प्रयत्न करतात.
आतड्यात जंत का तयार होतात
एम्समधील डॉक्टरांच्या मते, अनेक लोकं जेवताना स्वच्छतेची काळजी घेत नाही. यासह जेवण बनवताना देखील स्वच्छतेची काळजी घेत नाही. त्यामुळे आतड्यात कृमी होतात. यासह शरीरात विविध आजार उद्भवतात. अशा परिस्थितीत स्वच्छता राखणे आवश्यक.