Join us   

अंथरुणावर पाठ टेकताच लागेल गाढ झोप; करा फक्त ६ सोप्या गोष्टी- दिवसभर वाटेल फ्रेश,वाढेल कार्यक्षमता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 12:19 PM

6 tricks for quick sleeping : रात्री झोप चांगली झाली नाही तर त्याचा आपल्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो.

हेल्दी लाईफ स्टाईलचा आनंद घेण्यासाठी पुरेशी झोप घेणंसुद्धा तितकंच महत्वाचं असतं. काही लोकांना स्लिप डिसॉर्डरचा सामना करावा लागतो यामुळे झोप पूर्ण होण्यात अडथळे येतात. अशावेळी रात्री व्यवस्थित झोप येत नाही. काही साध्या, सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही  काही मिनिटात डिप स्लिप मिळवू शकता. (6 tricks for quick sleeping) एक्सपर्ट्सच्या मते रोज रात्री ६ ते ८ तासांची झोप घेतल्यानं बरेच आजार टळतात. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत ताण तणावामुळे बऱ्याचजणांना रात्री लवकर झोप येत नाही.  रात्री गाढ झोप येण्यासाठी काही ट्रिक्स फायदेशीर ठरू शकतात. (How to get sleep faster Avoid sleep disorder and remain fit or healthy)

मसाज करा

रात्री झोप येत नसेल तर तुम्ही मसाज थेरेपी ट्राय करू शकता. मसाज थेरेपी रात्री झोप येण्यासाठी उत्तम उपाय आहे. यासाठी तेलानं डोक्याची मालिश करा यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल आणि झोप लवकर येईल.

अंघोळ करायला विसरू नका

रात्री गाढ झोप येण्यासाठी तुम्ही कोमट पाण्यानं अंघोळ करा. कोमट पाण्यानं अंघोळ केल्यास शरीराचा सर्व थकवा निघून जातो. यामुळे झोप चांगली लागण्यास मदत होते. 

बुक रिडींग करा

भरपूर झोप घेण्यासाठी रात्री पुस्तकं वाचणं सुद्धा महत्वाचं आहे. झोपण्याआधी तुम्ही पुस्तकं वाचू शकता यामुळे चांगली झोप येते आणि फ्रेश वाटतं. 

अति वर्कआऊट करू नका

काही लोकांना वर्कआऊट इतर फिजिकल एक्टिव्हीटज करण्याची सवय असते. यामुळे झोप येण्यात अडथळे येऊ शकतात. म्हणून झोपण्याच्या ३ तास आधी वर्कआऊट करणं टाळायला हवं.

वेळेवर जेवा

लोकांना रात्री खाल्यानंतर झोपायची सवय असते. यामुळे झोप येण्यास अडचण होते तर कधी पचनाच्या समस्या ही उद्भवतात.  म्हणूनच झोपण्याच्या ३ तास आधी जेवायला हवं. 

ओघळलेल्या स्तनांना परफेक्ट शेप येण्यासाठी घरीच करा २ व्यायाम; सुडौल, आकर्षक दिसाल

झोपण्याची वेळ निश्चित असावी

चांगल्या झोपेसाठी उठण्याची आणि झोपण्याची वेळ निश्चित असावी. यामुळे चांगली झोप येण्यासाठी मदत होते आणि शरीरही एक्टिव्ह राहते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स