Join us   

गॅस-अपचनाने पोट फुगतं, जेवण जात नाही? तज्ज्ञ सांगतात ६ उपाय, पोटाचे त्रास कायमचे मिटतील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 1:06 PM

6 Ways to Get Rid of Gas Pains and Bloating : उन्हाळ्यात जेवणाच्या वेळा चुकल्या की अजीर्ण होतं. पुन्हा दुसऱ्या जेवणाची वेळ झाल्यानंतर आपण खातो किंवा चहा, कॉफी घेतो.

उन्हाळ्याच्या दिवसात लोकांना खूप कमी भूक लागते या दिवसात एसिडिटी ब्लॉटिंगची समस्या बरीच जाणवते. (Simple ways to reduce bloating) वाढतं वजन, एसि़डीटी, सतत घाम येणं यामुळे हा त्रास वाढतो. गरमीच्या वातावरणात अस्वस्थ वाटणं, अन्नाचं पचन व्यवस्थित न होणं तर कधी जुलाब असे त्रास हमखास उद्भवतात. उन्हाळ्याच्या दिवसात द्रवपदार्थांचे अधिकाधिक सेवन करायला हवं जेणेकरून शरीर हायड्रेट राहील. (6 Ways to Get Rid of Gas Pains and Bloating)

उन्हाळ्यात जेवणाच्या वेळा चुकल्या की अजीर्ण होतं. पुन्हा दुसऱ्या जेवणाची वेळ झाल्यानंतर आपण खातो किंवा चहा, कॉफी घेतो. आधीच खाल्लेल्या अन्नाचं पचन झालं नाही आणि परत दुसरं काही खाल्लं तर आंबट ढेकर येतात तर कधी पोटात गुडगुड होतं. अशावेळी काहीजणांना कॉन्स्टीपेशनचा त्रास जाणवतो तर काहींना जुलाब होतात. हे त्रास टाळण्यासाठी रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करायला हवा. जेणेकरून तब्येत चांगली राहील. (Gas & Bloating Natural Remedies)

आलं

आल्यात एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. जे एसिड रिफ्लेक्सच्या लक्षणांना दूर करण्यास मदत करतात. याशिवाय पोट आणि आतड्यांच्या समस्येपासूनही आराम मिळतो. आल्याचा समावेश तुम्ही जेवणात वेगवेगळ्या पदार्थांतून करू शकता.  आल्याचा चहा किंवा जिंजर कॅण्डीचा वापर करू शकता. 

अननस

अननसाच्या सेवनानं खाल्लेलं अन्न लवकर पचण्यास मदत होते. रोजच्या आहारात अननसाचे सेवन करायला हवे. या फळात ब्रोमेलॅन नावाचे तत्व असते जे प्रोटीन्स एंजाईम्सचे एक संयोजन आहे. यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

एव्हॅकॅडो

या फळात भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे पोट आणि आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर निघण्यास मदत होते आणि आतचे स्वच्छ राहतात.

काकडी

उन्हाळ्याच्या दिवसात काकडी खाणं हा उत्तम ऑप्शन आहे. काकडीत पाण्याचे प्रमाण भरपूर असते. यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते याशिवाय एसिडिटी कमी करण्यासही मदत होते.

कॅमोमाईल टी

कॅमोमाईल चहा एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. जे एसिड रिफ्लेक्सच्या लक्षणांना कमी करण्यास मदत करतात.  झोपण्याआधी कॅमोमाईल चहा प्यायल्यानं पोटाच्या संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.

बडिशेप

बडिशेपेच्या बियांमध्ये पचन एंजाईम्सचे उत्पादन वाढवून पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतात. यामुळे एसिड रिफ्लेक्स रोखण्यासही मदत होते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य