Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जेवल्यानंतर पोट डब्ब होतं, फुगल्यासारखं वाटतं? तज्ज्ञ सांगतात, ६ उपाय- पचन सुधारेल लवकर

जेवल्यानंतर पोट डब्ब होतं, फुगल्यासारखं वाटतं? तज्ज्ञ सांगतात, ६ उपाय- पचन सुधारेल लवकर

6 ways to reduce bloating: Quick tips and long-term relief ब्लोटिंगचा त्रास होतो अशी तक्रार हल्ली अनेकजण करतात. त्याची कारणं काय आणि उपाय कोणते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 06:25 PM2023-06-16T18:25:32+5:302023-06-16T18:26:33+5:30

6 ways to reduce bloating: Quick tips and long-term relief ब्लोटिंगचा त्रास होतो अशी तक्रार हल्ली अनेकजण करतात. त्याची कारणं काय आणि उपाय कोणते?

6 ways to reduce bloating: Quick tips and long-term relief | जेवल्यानंतर पोट डब्ब होतं, फुगल्यासारखं वाटतं? तज्ज्ञ सांगतात, ६ उपाय- पचन सुधारेल लवकर

जेवल्यानंतर पोट डब्ब होतं, फुगल्यासारखं वाटतं? तज्ज्ञ सांगतात, ६ उपाय- पचन सुधारेल लवकर

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे पोट फुगण्याची समस्या निर्माण होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आहारात बदल होतो, तेव्हा ब्लोटिंग होते. ब्लोटिंग होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जसे की वेळेवर न झोपणे, काहीतरी जड खाणे, आहारापेक्षा जास्त खाणे किंवा जीवनशैलीत बदल.

जर आपण ब्लोटिंगच्या समस्येपासून त्रस्त असाल तर, जीवनशैलीत काही बदल, खाण्या - पिण्याच्या सवयींमध्ये बदल यासह डॉक्टरांचा साला घ्यायला हवा. कधीकधी तणाव किंवा हार्मोनल असंतुलनामुळे देखील ब्लोटिंग होऊ शकते. यासंदर्भात, डायटीशियन मनप्रीत यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ब्लोटिंग सायकल म्हणजे काय, ब्लोटिंग होण्यामागील मुख्य कारण, व ब्लोटिंगवर उपाय याची माहिती दिली आहे(6 ways to reduce bloating: Quick tips and long-term relief).

ब्लोटिंग सायकल म्हणजे काय ?

ब्लोटिंगचे मुख्य कारण स्लो मेटाबॉलिज्म आहे.

मंद चयापचयमुळे, अन्न दीर्घकाळ पोटात राहते.

बॅक्टेरिया आणि बुरशीसारखे रोगजनक हे अन्न त्यांचा आहार बनवतात.

पाणी पिऊनही सतत तहान लागते, घशाला कोरड पडते? ५ कारणं, वेळीच ओळखा त्रासदायक आजाराची लक्षणं..

यामुळे शरीरातील टॉक्सिन्स वाढतात.

पोटात कचरा जमा होऊ लागतो.

यामुळे आतड्यांमध्ये जळजळ होते आणि ओटीपोटात लिक्विड टिकून राहते.

या पूर्ण चक्रानंतर ब्लोटिंग होते. त्यामुळे उलटी - जुलाब अशी समस्या निर्माण होते.

या टिप्स करतील मदत

अन्न नीट चावून खा. त्यामुळे अन्नाचे पचन नीट होते आणि त्यात असलेले पोषणही शरीर चांगले शोषून घेते.

जेवण करण्यापूर्वी 30 मिनिटे आधी लिंबू पाणी प्या. लिंबू पाणी आपल्या पचनसंस्थेला आराम देते, यासह शरीराचा pH संतुलित राखण्यास मदत करते.

दुपारच्या जेवणात पुदिना दही खा. हे पाचक एंजाइम सक्रिय करून पचन सुधारते.

डाळी आणि भाज्यांमध्ये हिंग जरूर टाका. अन्न पचवण्यासाठी हिंग चांगला मानला जातो. हे आपल्या पोटातील पचनशक्ती सुधारते.

वजन कमी करायचं तर आधी पचन सुधारा! करा ४ गोष्टी, झटपट कमी होतील नकोसे फॅट्स

झोपण्यापूर्वी दुधात गुलकंद घालून प्या. यामुळे पचनसंस्थेला आराम मिळतो आणि शरीराचा पीएच लेव्हलही संतुलित राहतो.

Web Title: 6 ways to reduce bloating: Quick tips and long-term relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.