Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ६० टक्के महिलांना थायरॉईडची झाल्याचं लक्षातच येत नाही, कारण...माहित हवी १० लक्षणे

६० टक्के महिलांना थायरॉईडची झाल्याचं लक्षातच येत नाही, कारण...माहित हवी १० लक्षणे

60 Percent Women Does not know 10 Symptoms of Thyroid : थायरॉइडची लक्षणे इतर आजारांशी मिळतीजुळती असल्याने आपल्याला थायरॉईड आहे हे महिलांना आणि काही वेळा डॉक्टरांनाही लक्षात येत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2023 05:33 PM2023-01-18T17:33:03+5:302023-01-18T17:44:09+5:30

60 Percent Women Does not know 10 Symptoms of Thyroid : थायरॉइडची लक्षणे इतर आजारांशी मिळतीजुळती असल्याने आपल्याला थायरॉईड आहे हे महिलांना आणि काही वेळा डॉक्टरांनाही लक्षात येत नाही.

60 Percent Women Does not know 10 Symptoms of Thyroid : 60 percent of women do not realize that they have thyroid, because... 10 symptoms you should know | ६० टक्के महिलांना थायरॉईडची झाल्याचं लक्षातच येत नाही, कारण...माहित हवी १० लक्षणे

६० टक्के महिलांना थायरॉईडची झाल्याचं लक्षातच येत नाही, कारण...माहित हवी १० लक्षणे

Highlightsआरोग्याकडे योग्य पद्धतीने लक्ष देणे आणि कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष न करणे आवश्यक असते निदान आणि उपचार उशीरा सुरू झाल्याने ही समस्या वाढलेली असते.

थायरॉईड ही महिलांमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलेली समस्या असल्याचे दिसते. हार्मोन्समध्ये झालेल्या बदलामुळे थायरॉईड होतो.  वेळीच थायरॉईड झाल्याचे लक्षात न आल्यास ही समस्या वाढते आणि आरोग्याच्या गुंतागुंती निर्माण होतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या जर्नलनुसार, जगभरात आठपैकी एक महिला थायरॉइड आजाराने ग्रस्त आहे. तरीही ६० टक्के महिलांना या आजाराची लक्षणे माहीत नाहीत. आता असे का तर थायरॉइडची लक्षणे इतर आजारांशी मिळतीजुळती असल्याने आपल्याला थायरॉईड आहे हे महिलांना आणि काही वेळा डॉक्टरांनाही लक्षात येत नाही (60 Percent Women Does not know 10 Symptoms of Thyroid) . 

त्यामुळेच या समस्येचे निदान व्हायला आणि मग पर्यायाने उपचारांना उशीर होतो. निदान आणि उपचार उशीरा सुरू झाल्याने ही समस्या वाढलेली असते. थायरॉइड ही समस्या स्वयंप्रतिकारशक्तीशी निगडीत असल्याचा संशय असला तरी, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हे प्रमाण अधिक आहे.स्त्रियांमध्ये मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती दरम्यान उद्भवणारे थायरॉइड संप्रेरकातील असंतुलन देखील एक प्रमुख कारण आहे.

 

(Image : Google)
(Image : Google)

थायरॉईड होण्याचे नेमके वय नसले तरी ज्या स्त्रियांनी नुकताच बाळाला जन्म दिला आहे किंवा रजोनिवृत्तीतून जात आहेत किंवा ज्या महिला ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयात रजोनिवृत्तीतून जात आहेत अशा स्त्रियांना थायरॉईडचा धोका जास्त असतो. त्यामुळे आरोग्याकडे योग्य पद्धतीने लक्ष देणे आणि कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष न करता तिचे वेळीच निदान करणे अतिशय आवश्यक असते. 

थायरॉईडची लक्षणे 

१. अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे 

२. मासिक पाळी अनियमित असणे 

३. पॉलिसिस्टीक ओव्हरीयन सिंड्रोम 

४. उच्च रक्तदाब 

५. आळस आणि थकवा 

६. केस आणि त्वचा प्रमाणापेक्षा जास्त कोरडी पडणे 

७. कॉन्स्टीपेशन 

८. चिडचिड

९. घाम येणे 

१०. इनफर्टीलिटी 

Web Title: 60 Percent Women Does not know 10 Symptoms of Thyroid : 60 percent of women do not realize that they have thyroid, because... 10 symptoms you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.