Join us   

रोज १ अंजीर खाण्याचे ७ भन्नाट फायदे, हाडे होतील मजबूत - वजनही होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2023 12:03 PM

7 health benefits of having dry anjeer fig : आरोग्याच्या बहुतांश समस्यांसाठी उपयुक्त अंजीर खायलाच हवेत...

थंडीच्या दिवसांत आपण साधारपणे सुकामेवा खातोच. यामध्ये बदाम, काजू, पिस्ते, मनुके यांचा समावेश असतो. पण जरदाळू किंवा अंजीर यांसारखा सुकामेवा आपण खातोच असे नाही. महाग असल्याने हे जास्त आणलेही जात नाहीत. पण ड्राय अंजीर खाण्याचे आरोग्याला खूप फायदे असतात, त्यामुळे ते आवर्जून खायला हवे. अंजीरमधे कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नीज, फायबर, ब6 जीवनसत्व, ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे घटक भरपूर प्रमाणात असतात.  तर दुधात प्रथिनं, कॅल्शियम, अ, ड, क, ई ही जीवनसत्व आणि राइबोफ्लेविन हे घटक असतात. त्यामुळे आरोग्याच्या विविध तक्रारींवर अंजीर खाणे फायदेशीर ठरते. पाहूयात अंजीर खाण्याचे ७ फायदे (7 health benefits of having dry anjeer fig)...

१. वजन कमी करणे

अंजीरामध्ये असणारा फायबर हा घटक वाढलेलं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो.

२. पोटाच्या समस्यांसाठी फायदेशीर

अंजीरात असणारे प्रिबायोटीक गुणधर्म ज्यामुळे शरीरातील गुड बॅक्टेरीया वाढण्यास मदत होते. यामुळे पोटाशी किंवा पचनाशी निगडीत समस्या दूर होण्यास मदत होते.

(Image : Google)

३. उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत

अंजीरात असणारा पोटॅशियम हा घटक वाढलेला रक्तदाब कमी करण्यास मदत करतो. 

४. हाडं मजबूत होतात

हाडांसाठी आवश्यक असणारे कॅल्शियम अंजीरात भरपूर प्रमाणात असल्याने हाडं मजबूत राहण्यासाठी याचा अतिशय चांगला फायदा होतो.  

५. वाढलेलं वय दिसू नये म्हणून

वय वाढलं की त्वचेवर सुरकुत्या येणे, केस पांढरे होणे अशा समस्या उद्भवतात. पण नियमितपणे अंजीर खाल्ले तर या समस्या दूर होण्यास मदत होते आणि तुम्ही दिर्घकाळ तरुण दिसता.

६. हॉर्मोन बॅलन्सिंगसाठी फायदेशीर

अंजीरामध्ये लोह, झिंक, मॅग्नेशियम आणि मँगनीज असते त्यामुळे हार्मोन्स बॅलन्स होण्यास त्याची चांगली मदत होते. तसेच लैंगिक आरोग्य सुधारण्यासही याचा चांगला फायदा होतो. 

७. श्वसनाशी निगडीत समस्या 

श्वसन मार्गातील अडथळे दूर करुन श्वसनाशी निगडीत समस्या सुरळीत करण्यासाठीही अंजीर खाण्याचा चांगला उपयोग होतो.  

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना