Join us   

गणपतीला वाहिलेल्या हिरव्यागार दुर्वांचे ७ भन्नाट फायदे, त्वचा विकार ते पोटाचे आजार-पाहा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2024 5:20 PM

Medicinal & Versatile Uses of an Amazing Durva Grass : Durva Grass Health Benefits : Health Benefits Of Durva Grass : गणपती बाप्पाला अर्पण करण्यात येणाऱ्या इवलुशा दुर्वां आरोग्यासाठी फायदेशीर...

गणपती बाप्पाला हिरव्यागार दुर्वा खूप आवडतात. मोदक, लालचुटुक जास्वंदीच्या फुलासोबतच बाप्पाला दूर्वाही तितक्याच प्रिय आहेत.दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती पूजन पूर्ण होत नाही. गणरायाची पुजा करताना आपण २१ दुर्वांची जुडी, जास्वंदीची फुले आणि २१ मोदकांचा नैवेद्य अर्पण करतो. गणपती बाप्पाच्या पूजेत हार, फळं, फुलांइतकेच हिरव्यागार दुर्वांना फार महत्वाचे स्थान आहे. गणपती बाप्पांचे आगमन झाल्यानंतर दहा दिवसांत आपण दुर्वांचा हार, जुडी, कंठी अशा वेगवेगळ्या प्रकारे भक्तिभावाने बाप्पाला दुर्वा अर्पण करतो(Durva Grass Health Benefits).

गणपती बाप्पाला आवडणाऱ्या या दुर्वा आपल्या आरोग्यासाठीही अतिशय गुणकारी आहेत. दुर्वांमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे. दुर्वा या गणपती बाप्पाच्या पूजेत जितक्या महत्वाच्या असतात तितक्याच त्या आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात. आरोग्याच्या अनेक तक्रारींपासून ते सुंदर त्वचेपर्यंत अनेक गोष्टींसाठी दुर्वा (Health Benefits Of Durva Grass) फार उपयुक्त ठरतात. गणपती बाप्पाला अर्पण केल्या जाणाऱ्या दुर्वा आपल्या आरोग्यासाठी नेमक्या कशा फायदेशीर ठरतात ते पाहूयात(Medicinal & Versatile Uses of an Amazing Durva Grass).

इवलुशा दुर्वांचे अनेक फायदे... 

१. दुर्वा आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत. दुर्वा ही एक आयुर्वेदीक वनस्पती आहे. दुर्वाची चव काहीशी गोडसर असून, यामध्ये प्रोटिन्स, कार्बोहायड्रेडस, कॅल्शियम, फायबर आणि पोटॅशियम फार मोठ्या प्रमाणात असतात. 

२. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त उष्णतेमुळे अनेकदा नाकातून रक्त येते. अशावेळी दुर्वांच्या रसाचे काही थेंब नाकात सोडल्यास नाकातून रक्त येणे बंद होते. 

साखर- गूळ न वापरता करा बाप्पाच्या प्रसादासाठी अगदी १० मिनिटांत हाय प्रोटीन पौष्टिक  मोदक... 

३. तोंड आले किंवा तोंडामध्ये फोड आले असल्यास दुर्वांचा रस पाण्यामध्ये मिसळून या पाण्याने खळखळून चुळा भराव्यात. या उपायामुळे तोंडाची होणारी आग कमी होऊन बराच आराम मिळतो.  

४. पचन क्रियेचा त्रास असल्यास किंवा पचनाच्या अनेक समस्यांवर दुर्वा अतिशय फायदेशीर ठरतील. पचन क्रियेसंबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी दररोज १ ते २ टेबलस्पून दुर्वांचा रस प्यावा. 

५. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे किंवा ज्यांच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहत नाही यासाठी दुर्वा हा एक खास रामबाण उपाय आहे. दूर्वांमुळे इन्सुलिन स्पाईक रोखले जाते आणि रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात आणण्यास मदत मिळते. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही दररोज १ ते २ टेबलस्पून दुर्वांचा रस पिऊ शकता. 

६. दुर्वा दह्यासोबत घेतल्यास मूळव्याध किंवा महिलांमध्ये अंगावरुन पांढरे जाण्याची समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

बाप्पाला वाहिलेली जास्वंदीची फुले  टाकू नका,  माळा केसात सुंदर- नाजूक गजरा - करा ५ मिनिटांत... 

७. दुर्वा नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करते. तसेच त्यामध्ये अल्कनीटचे संतुलन ठेवण्यास मदत करते. यामुळे इजा, जखम झाल्यास किंवा मासिक पाळीतही अतिरिक्त प्रमाणात रक्तप्रवाह होत नाही. 

७. त्वचेचे नैसर्गिक तेज वाढवण्यासाठी दुर्वा वाटून त्याचा लेप चेहऱ्याला लावावा.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स