Join us   

रिकाम्या पोटी कडीपत्ता खाण्याचे ७ फायदे; केसगळतीसह वजनाच्या समस्या आणि पोटाचे विकार होतील दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2024 11:56 PM

7 Benefits Of Eating Kadhi Patta Empty Stomach : रोज कडीपत्ता खा आरोग्य राहील तंदुरुस्त

आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो (Health Tips). त्यामुळे निरोगी राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहारात योग्य बदल करणे (Curry Leaves). आरोग्यदायी गोष्टींचा आहारात समावेश केल्यास आरोग्य चांगले राहते. त्याच वेळी, चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे आहारात प्रत्येक गोष्टींचा समावेश करायला हवा.

कोथिंबीर, पुदिना, कडुलिंब आणि कढीपत्त्यासह अनेक पाने आहेत, जी औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. आहारात यांचा समावेश केल्यास अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. बरेच लोक पदार्थातून कडीपत्ता वगळून काढतात. पण कडीपत्ता खाण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी रिकाम्या पोटी ६- ७ कडीपत्ता चघळून खाल्ल्यास शरीरात सकारात्मक बदल दिसून येतात. १४ दिवस रिकाम्या पोटी कडीपत्ता चघळून खाल्ल्यास कोणते बदल घडतात? याची माहिती आहारतज्ज्ञ नंदिनी यांनी दिली आहे(7 Benefits Of Eating Kadhi Patta Empty Stomach).

१४ दिवस रिकाम्या पोटी कडीपत्ता खाल्ल्यास शरीरात कोणते बदल घडतात?

- कडीपत्त्यात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे चेहरा तजेलदार दिसतो. जर आपल्याला मुरुमांची समस्या असल्यास आपण रिकाम्या पोटी कडीपत्ता चघळून खाऊ शकता.

प्रेमात पडलात पण चॅटिंग करताना चुकून काढू नका हे ४ विषय, नाहीतर होईल भांडण-ब्रेकअपच

- जर शरीरात बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढली असेल तर, रिकाम्या पोटी ६ -७ कडीपत्त्याची पानं चघळून खा. यामुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होईल.

- कडीपत्ता पचनासाठीही फायदेशीर आहे. जर आपल्याला पचनाच्या निगडीत समस्या असल्यास तर, दररोज रिकाम्या पोटी कडीपत्ता खा.

- कडीपत्त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास आणि अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात.

बटाट्याला हिरवे-पांढरे कोंब आले तरी ते काढून बटाटे खाता? ही १ डेंजर गोष्ट लक्षात ठेवा..

- रोज सकाळी रिकाम्या पोटी कडीपत्ता खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, आहारात नक्कीच कडीपत्त्याचा समावेश करा.

- कडीपत्ता शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. याचे दररोज सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होते.

- रोज रिकाम्या पोटी कडीपत्ता खाल्ल्याने केस गळणेही कमी होऊ शकते. शिवाय पांढरे केसही होत नाही. 

टॅग्स : केसांची काळजीब्यूटी टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य