Join us   

भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियम हवे- खा ७ गोष्टी, न्यूट्रिशन डेफिशियन्सी टाळा आणि हाडं ठेवा ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2023 4:18 PM

7 Best Protein, Calcium - Rich Foods For Stronger Bones प्रोटीन कमी, कॅल्शियम कमी म्हणून अनेक आजार मागे लागतात, ते आजार टाळा

वयानुसार आपल्यात अनेक बदल घडतात. जेव्हा आपण २५ व्या वयोगटात पदार्पण करतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने तारुण्यात पाऊल ठेवतो. या वयात आपण करिअर, लग्नाची तयारी, शिक्षण या सगळ्या गोष्टीत गुंतून जातो. ही कामं करण्यासाठी शरीराला उर्जाही तितकीच लागते. त्यासाठी आहारात कॅल्शियम आणि प्रोटीन्सचा समावेश असणं गरजेचं आहे.

यासंदर्भात, फॅट टू स्लिमच्या संचालिका, व आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा सांगतात, 'या वयात शरीराला स्ट्रँाग करणं खूप गरजेचं आहे. असे अनेक लोक आहेत जे या वयात टेन्शनमुळे खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाहीत. ज्यामुळे कमी वयात गंभीर आजार निर्माण होतात. आपण हे शरीर म्हातारपणासाठी तयार करत आहोत, हे ही विसरू नका. जर आपण या वयात शरीराची योग्य काळजी घेतली नाही तर, तर शरीरात भासणाऱ्या कमतरतेमुळे अनेक आजार उद्भवू शकतात'(7 Best Protein, Calcium - Rich Foods For Stronger Bones).

शरीरासाठी कॅल्शियम आणि प्रोटीन महत्त्वाचे का आहेत?

कॅल्शियम हाडे, दात, हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. तर प्रथिने स्नायूंची वाढ, ब्लड सर्क्युलेशन, शरीराच्या सामान्य विकासासाठी मदत करतात. २५ वर्षानंतर शरीराला प्रत्येक गोष्टीसाठी भरपूर ऊर्जा आणि ताकद लागते. कमकुवत हाडांमुळे प्रत्येक कामात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे आहारात कॅल्शियम आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश असणं गरजेचं आहे.

नाश्त्याला चुकूनही खाऊ नयेत असे ४ पदार्थ, वजन वाढते - तब्येत बिघडते

डेअरी प्रॉडक्ट्स

दूध, दही, चीज आणि ताक यासारखे दुग्धजन्य पदार्थ हे कॅल्शियम आणि प्रथिनांचे प्रमुख स्त्रोत आहेत. दुधामध्ये व्हिटॅमिन डी देखील असते, जे शरीरात कॅल्शियम चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करते. त्यामुळे आपल्या आहारात डेअरी प्रॉडक्ट्सचा समावेश करा.

मखाना आणि तीळ

मखाना प्रथिने आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. आपण मखाने तेलाशिवाय तयार करून खाऊ शकता. चवीला क्रिस्पी आणि शरीरासाठी मखाना हेल्दी मानला जातो. तिळामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन असते. आपल्या आहारात मखाना आणि पांढऱ्या तिळाचा समावेश केल्याने दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते.

कितीही प्रयत्न केले तरी सकाळी लवकर जाग येत नाही? रात्री ५ चुका करणे टाळा, आलार्मविना येईल जाग

बदाम आणि खजूर

बदामामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते. जे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. खजूर देखील कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. यासोबतच यामध्ये लोह देखील आढळते, ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशनमध्ये कोणतीही अडचण येत नाही. दररोज दुधात बदाम आणि खजूर भिजवून खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.

सोयाबीन

सोयाबीन हे प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा उत्तम स्रोत आहे. काळ्या आणि पांढऱ्या चण्यांमध्ये कॅल्शियम आणि प्रथिनांसह भरपूर लोह आढळते. ज्यामुळे शरीराला काम करण्याची उर्जा मिळते.

पाले भाज्या

वयाच्या २५ व्या वर्षी भरपूर पालेभाज्या खाव्यात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. इतकेच नाही तर विविध प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजेही भाज्यांमध्ये आढळतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य