Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वजन घटवून फिट व्हायचं तर नेमकं काय जेवायचं? ही घ्या यादी..

वजन घटवून फिट व्हायचं तर नेमकं काय जेवायचं? ही घ्या यादी..

7 day weight loss diet plan recommended by fitness coach : वजन कमी करण्यासाठी ७ दिवसांचा डाएट प्लॅन त्यांनी सांगितला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 01:23 PM2023-01-29T13:23:54+5:302023-01-29T18:35:21+5:30

7 day weight loss diet plan recommended by fitness coach : वजन कमी करण्यासाठी ७ दिवसांचा डाएट प्लॅन त्यांनी सांगितला आहे.

7 day weight loss diet plan recommended by fitness coach simrun chopra for northern | वजन घटवून फिट व्हायचं तर नेमकं काय जेवायचं? ही घ्या यादी..

वजन घटवून फिट व्हायचं तर नेमकं काय जेवायचं? ही घ्या यादी..

जास्तीत जास्त लोक  वजन कमी करण्यासाठी डाएटिंगकडे वळतात. अशावेळी काय खायचं काय टाळायचं हे पूर्णपणे माहीत नसल्यानं लठ्ठपणा वाढत जातो. यात लठ्ठपणाला ट्रिगर करणारे कार्ब्स आणि कॅलरीजयुक्त अन्नपदार्थ असतात. फिटनेस प्रशिक्षक सिमरुन चोप्रा निरोगी वजन आणि आरोग्यासाठी संतुलित आहाराची शिफारस करतात. कारण ते प्रभावीपणे कार्य करण्यासाठी शरीराला आवश्यक तेवढे इंधन पुरवते. एनबीटी या वेब पोर्टलशी बोलताना त्यांनी वजन कमी करण्यासाठी ७ दिवसांचा डाएट प्लॅन त्यांनी सांगितला आहे. (7 day weight loss diet plan recommended by fitness coach simrun chopra for northern)

पहिला दिवस-

नाश्ता- पोहे + ताक, दुपारचं जेवण - कोळंबी/सोया बिर्याणी + कोशिंबीर, स्नॅक्स-  कुरमुरे भेळ, गव्हाचे नान + पालक पनीर

दुसरा दिवस-

नाश्ता- बेसन चिल्ला / मूग डाळीचा डोसा, दुपारचे जेवण- भात + मुळा करी, स्नॅक्स- भाजलेला मखाना/शेंगदाणे/चणे, रात्रीचं जेवण- भाकरी+ मूग डाळ तडका + गवार करी (जेवणत सर्व भाज्यांचा समावेश करा)

दिवस तिसरा

नाश्ता- व्हेज ऑम्लेट + टोस्ट, दुपारचं जेवण- चणे करी + कोबी भात, स्नॅक्स- खाकरा/फळ, रात्रीचे जेवण- दाल बाटी + हिरवी चटणी + ताक (दिवसभरातून कमीतकमी एकदा ताक, दही घ्यावे)

चौथा दिवस

नाश्ता- झुणका + भाकरी, दुपारचं जेवण- मेथी गार्लिक ब्रेड + तंदूरी चिकन/ पनीर + चिरलेली कोशिंबीर, स्नॅक-, छोले चाट, रात्रीचे जेवण- जीरा राइस + फिश अमृतसरी / पनीर भुर्जी + सॅलेड

दिवस पाचवा

नाश्ता - मेथी पराठा + हिरवी चटणी/दही, दुपारचे जेवण- भाजी दम बिर्याणी + लेडीज रायता, स्नॅक- रताळे चाट,  रात्रीचे जेवण - ज्वारीची भाकरी + भाजी + पनीर टिक्का.

दिवस सहावा

नाश्ता- थालीपीठ + हरी चटनी, दुपारचं जेवण- भात, राजमा, स्नॅक्स- फळ,  रात्रीचं जेवण-  रुमाली रोटी, मेथी चिकन/ मेथी दाल तडका

दिवस सातवा

नाश्ता पनीर पराठा,  दुपारचं जेवण- व्हेज पराठा + छोले करी, स्नॅक- ढोकळा/फळ, रात्रीचे जेवण- मक्याची चपाती, कोबी चणा टिक्का मसाला.

Web Title: 7 day weight loss diet plan recommended by fitness coach simrun chopra for northern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.