चष्मा लागण्याचा आणि वय वाढण्याचा आता काहीही संबंध राहिलेला नाही. अगदी पुर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागातील मुलांनाही चष्मा लागतोय. त्यातही लॉकडाऊननंतर तर लहान मुलांना चष्मा (how to get rid of glasses) लागण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. कारण या काळात एक तर कंटाळा येतो म्हणून, खेळायला कुणी नाही म्हणून आणि अभ्यास, ट्यूशन, शाळा असं सगळंच ऑनलाईन झालं म्हणून मुलांचा स्क्रिन टाईम (screen timing) प्रचंड वाढला. याचाच परिणाम म्हणजे कमी वयात लागलेला चष्मा, डोळ्यांना आलेला थकवा आणि ताण. हा त्रास तसेच डोळ्यांचा नंबर कमी करण्यासाठी (How to improve eye sight?) satvicmovement या इन्स्टाग्राम पेजवर योगतज्ज्ञांनी काही व्यायाम (Eye exercises) सांगितले आहेत.
डोळ्यांचे व्यायाम (Eye exercises) हे सगळे व्यायाम करण्यासाठी एका जागी शांत- ताठ बसावे आणि मन शांत करून एकाग्रतेने हे व्यायाम करावेत. १. पहिला व्यायाम म्हणजे चेहऱ्याच्या किंवा शरीराच्या इतर भागांची हालचाल न करता एकदा वर तर एकदा खाली बघावे. ही क्रिया १० वेळा करावी.
माधुरी दीक्षितची सुंदर हिरवी बांधणी साडी!! बघा बांधणी साडीवर कशी करायची फॅशन
२. दुसऱ्या व्यायामामध्ये एकदा डावीकडे तर एकदा उजवीकडे बघावे. ही क्रिया देखील १० वेळा करावी.
३. तिसरा व्यायाम करण्यासाठी डोळ्यांची डायगोनल म्हणजेच तिरक्या दिशेत हालचाल करावी. म्हणजेच वर बघताना डाव्या बाजूने पाहिले तर खाली बघताना उजव्या बाजूने पहावे, तसेच वर जर उजव्या बाजूने बघितले तर खाली डाव्या बाजूने बघावे. या दोन्ही क्रिया प्रत्येकी १०- १० वेळा कराव्या.
४. क्लॉकवाईज आणि ॲण्टी क्लॉकवाईज अशा दोन्ही दिशेने डोळे प्रत्येकी १०- १० वेळा फिरवावेत.
५. उजव्या हाताचा अंगठा अगदी नाकाच्या जवळ आणावा आणि हळूहळू हात शक्य होईल तितका लांब न्यावा. पुन्हा अंगठा हळूहळू नाकाजवळ आणावा. ही संपूर्ण क्रिया करताना अंगठ्यावर लक्ष केंद्रित करावे. ही क्रियाही १० वेळा करावी.
६. यानंतर दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासून निर्माण होणारी उष्णता डोळ्यांना द्यावी.
७. शेवटचा व्यायाम म्हणजे १० वेळा पटापट डोळ्यांची उघडझाप करावी.