Join us   

शरीरात आयर्नची कमतरता? थकवाही जाणवतोय? रोज खा ७ पदार्थ; पावसाळी इन्फेक्शन टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2024 3:01 PM

7 Healthy Foods That Are High in Iron : शरीरात झटपट लोह वाढवतात हे '७' पदार्थ; आजपासूनचं आहारात या पदार्थांचा समावेश करा

शरीरात लोहाची कमतरता ही सर्रास आढळून येते (Iron rich Foods). त्यावर वेळीच उपचार न केल्यास, थकवा जाणवणे आणि अॅनिमियासारख्या विविध समस्या जाणवू लागतात. लोहाच्या कमतरतेमुळे व्यक्तीच्या शरीरावर हळूहळू, पण हानिकारक परिणाम होऊ लागतात (Health Tips). म्हणूनच याला ‘सायलेंट किलर’, असेही म्हटले जाते(Iron rich foods for Blood).

शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी लोहयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते. शिवाय ब्लड सर्क्युलेशन सुधारते(7 Healthy Foods That Are High in Iron).

लोहयुक्त पदार्थ खाण्याचे फायदे

लोहयुक्त पदार्थ रक्त निर्मिती आणि विकासामध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. याशिवाय अनेक हार्मोन्सच्या निर्मितीसाठीही हे खनिज आवश्यक असते.

शुगर कंट्रोल ते बॅड कोलेस्टेरॉलवर खास उपाय, रोज आहारात हवी कोथिंबीर! फायदे किती? घ्या यादी..

रक्ताची निर्मित्ती कोणत्या पदार्थांमुळे पूर्ण होईल

डाळी

युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चरच्या मते, १०० ग्रॅम डाळीमध्ये २४.६ ग्रॅम प्रथिने आणि ६.५१ ग्रॅम लोह असते.  भारतीय घरांमध्ये डाळ - भात अवश्य असते. उडीद, मूग तुरडाळ, हरभरा यासह इतर डाळींमध्ये पौष्टीक घटक असतात. अनेक प्रकारच्या डाळी शरीराला प्रोटीन आणि लोह प्रदान करतात.

पनीर

पनीर हे प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे. पनीरमुळे स्नायूंना ताकद मिळते. शिवाय पनीरमधील लोह अशक्तपणा आणि थकवा दूर करण्यास मदत करते.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट रक्त वाढवण्यासोबत मूड सुधारण्यास मदत करते. यात आयर्नचे प्रमाण जास्त असते. जर आपल्याला मधुमेह किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असेल तर याचे सेवन नियंत्रित प्रमाणात करावे.

ब्रोकोली

जर आपल्या ब्लड सर्क्युलेशन सुधारणे यासह वजन कमी करायचे असेल तर ब्रोकोली खा. कोबीसारखी दिसणारी ही भाजी म्हणजे लोह, प्रथिने, फायबर आणि क जीवनसत्वाचे भांडार आहे. त्यामुळे ब्रोकोली या भाजीचा आहारात नक्कीच समावेश करा.

क्विनोआ

क्विनोआ हे उच्च प्रथिनयुक्त अन्न आहे. क्विनोआ खाल्ल्याने शिरला उर्जा मिळते. शिवाय हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते. कारण त्यात भरपूर लोहाचे प्रमाणही जास्त असते.

भोपळ्याच्या बिया

पोट साफच होत नाही? कॉन्स्टिपेशनमुळे हैराण? दुधात मिसळा '१' खास गोष्ट; रोजचा त्रास होईल कमी

भोपळ्याच्या बिया शरीराला अनेक पोषक तत्व प्रदान करतात. या बियांमध्ये निरोगी चरबी, प्रथिने, फायबर, लोह, व्हिटॅमिन के, मँगनीज आढळते. यात मधुमेह, नैराश्य आणि इन्शुलिन रेझिस्टन्स दूर करण्याची ताकद आहे. त्यामुळे भोपळ्याच्या बिया अवश्य खा.

पालक

पालक खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात खूप कमी कॅलरीजसह भरपूर लोह असते. यासोबतच व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, प्रोटीन आणि फायबर शरीराला मिळतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य