Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > गणपती बाप्पाला प्रिय असलेल्या दुर्वांचे महत्त्व मोठे, दुर्वा गुणकारी-आरोग्यासाठी लाभदायक, ८ फायदे

गणपती बाप्पाला प्रिय असलेल्या दुर्वांचे महत्त्व मोठे, दुर्वा गुणकारी-आरोग्यासाठी लाभदायक, ८ फायदे

8 Amazing Health Benefits of Durva Ganpati Festival : बाप्पाला वाहण्यात येणाऱ्या दुर्वा आरोग्यासाठी फायदेशीर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2023 03:24 PM2023-09-18T15:24:08+5:302023-09-18T15:26:09+5:30

8 Amazing Health Benefits of Durva Ganpati Festival : बाप्पाला वाहण्यात येणाऱ्या दुर्वा आरोग्यासाठी फायदेशीर...

8 Amazing Health Benefits of Durva Ganpati Festival : Durva which is dear to Ganapati Bappa has great significance, Durva is beneficial for health, 8 benefits | गणपती बाप्पाला प्रिय असलेल्या दुर्वांचे महत्त्व मोठे, दुर्वा गुणकारी-आरोग्यासाठी लाभदायक, ८ फायदे

गणपती बाप्पाला प्रिय असलेल्या दुर्वांचे महत्त्व मोठे, दुर्वा गुणकारी-आरोग्यासाठी लाभदायक, ८ फायदे

गणपती बाप्पाचे आगमन उद्यावर येऊन ठेपले आहे. गणपती बुद्धीची देवता असून गणपती म्हटले की आपल्याला आठवतात त्याला आवडणारे मोदक, जास्वंदाची फुलं, त्याचे वाहन असलेले उंदीरमामा आणि दुर्वाचा हार किंवा जुडी. आपण हे सगळे गणपतीला अतिशय भक्तीभावाने अर्पण करतो. या १० दिवसांत आपण गणपती बाप्पाची सेवा करतो आणि आपल्याकडे समृद्धी, भरभराट होवो यासाठी मागणीही करतो. गणपतीच्या सगळ्या गोष्टींमागे काही ना काही गोष्ट दडलेली आहे तशीच ती गणपतीच्या दुर्वांमागेही असणार. दुर्वा म्हणजे खरं तर मोकळ्या जागी वाढणाऱ्या गवतातील काड्या. पण गणपतीला याच २१ काड्यांची जुडी का आवडते आणि वाहिली जाते यामागे काही शास्त्र आहे. हे शास्त्र समजून घेतले आणि त्याचे महत्त्व लक्षात घेतले तर हे सणवार आणखी आनंददायी होतात. पाहूयात गणपती बाप्पाच्या दुर्वांचे औषधी गुणधर्म (8 Amazing Health Benefits of Durva Ganpati Festival)….

१. दुर्वांमध्ये असणारे फ्लॅवोनाइडस शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स करण्यास फायदेशीर ठरतात. 

(Image : Google)
(Image : Google)

२. अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यासाठी दुर्वांचा रस घेणे फायदेशीर ठरते. 

३. युरीने इन्फेक्शन झाल्यास दुर्वांच्या रसात लिंबाचा रस पिळायचा आणि ते प्यायचे. यामुळे युरीनला होणारी आग, जळजळ कमी होण्यास मदत होते. 

४. नाकातून रक्त येणं, ताप , अंगातील दाह कमी करण्यासाठी दुर्वांचा रस अमृतासमान असतो.

५. मासिक पाळीत प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्त्राव होत असेल किंवा जास्त प्रमाणात पोट दुखत असेल तर दुर्वांचा रस घेतल्यास त्याचा फायदा होतो. 

६. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी दुर्वांचा रस उपयुक्त ठरतो. मधुमेहींनी नियमितपणे हा रस घेतल्यास शुगर नियंत्रणात येण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

७. त्वचाविकार किंवा चेहऱ्यावर येणारे पुरळ, डाग निघून जाण्यास दुर्वांचा चांगला फायदा होतो. त्वचेचा दाह होत असेल तर तो कमी होण्यास मदत होते. 

८. विविध आजारांचा सामना करण्यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक असते. दररोज सकाळी दोन टेबलस्पून दुर्वांचा रस घेतला तरी आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते. 
 

Web Title: 8 Amazing Health Benefits of Durva Ganpati Festival : Durva which is dear to Ganapati Bappa has great significance, Durva is beneficial for health, 8 benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.