स्वयंपाकघरात जेवण करत असताना पदार्थाची चव वाढवण्यासाठी आपण अनेक मसाल्यांचा वापर करतो. मसाल्यांमुळे पदार्थाची चव द्विगुणीत होते. भारतीय मसाल्यांमध्ये गरम मसाला हा अधिक प्रमाणात वापरला जातो. गरम मसाला जेवणाची चव व सुंगंध तर वाढवतेच, यासह आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. लोहयुक्त गरम मसाल्याचे सेवन केल्याने अनेक आजार बरे होतात. यासह शरीरातील विषारी घटक बाहेर काढून चयापचय क्रिया सुधारण्यासाठी मदत करते.
यासंदर्भात, न्यूट्रिशनिस्ट जुही कपूर सांगतात, ''गरम मसाला आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चिमुटभर गरम मसाल्यात अनेक पौष्टीक घटक आढळतात. यासह त्यातून शरीराला भरपूर प्रमाणात आयर्न मिळू शकते. म्हणूनच स्वयंपाक करताना याचा नक्कीच वापर करा''(8 Powerful Health Benefits Of Garam Masala).
आयर्नचे प्रमाण जास्त
गरम मसाला करण्यासाठी वेलची, धणे, जिरे, काळी मिरी इत्यादींचा वापर केला जातो. न्यूट्रिशनिस्ट सांगतात, ''गरम मसाला आयर्नचे उत्तम स्त्रोत आहे. सुमारे १०० ग्रॅम धणे पावडरमध्ये १७ मिलीग्राम लोह असते, जिरं पावडरमध्ये २० मिलीग्राम लोह असते, तर जावित्रीमध्ये २० मिलीग्राम लोह असते. त्यामुळे ज्यांच्या शरीरात लोहाची कमतरता आहे, त्यांनी आपल्या आहारात गरम मसाल्याचा समावेश करावा.''
उन्हाळ्यात चुकुनही खाऊ नका हे ५ थंड पदार्थ, शरीराला थंडावा देण्याऐवजी वाढवतील उष्णता
या पद्धतीने घरीच करा गरम मसाला
100 ग्रॅम जिरे
75 ग्रॅम काळी मिरी
75 ग्रॅम वेलची
10 ग्रॅम छोटी वेलची
10 ग्रॅम लवंग
10 ग्रॅम दालचिनी
5 ग्रॅम लांब मिरपूड
5 ग्रॅम जावित्री
हे सर्व मसाले एकत्र बारीक करून मिक्स करा.
गरम मसाल्याचा वापर करताना ही चूक टाळा
अपचन-गॅसेस यामुळेही डोके प्रचंड दुखते? ५ उपाय, पोट होईल साफ-डोकेदुखीही थांबेल..
पोषणतज्ज्ञ सांगतात, ''गरम मसाल्याचे सेवन अतिप्रमाणात करू नका. कारण या मसाल्याचा प्रभाव खूप गरम असतो. जर जास्त प्रमाणात खाल्ल्यास पित्तदोष, शरीरातील उष्णता आणि ऍसिडिटी वाढू लागते.''
गरम मसाल्याने हे आजार होतात बरे
अशक्तपणा
खराब पचन
लठ्ठपणा
शारीरिक कमजोरी
हृदयरोग
कोलेस्टेरॉल
मधुमेह
संधिवात