Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > शरीरात प्रोटीन्सची कमतरता आहे हे कसं ओळखायचं? तब्येतीमध्ये हाेणारे 'हे' बदल सांगतात सावध व्हा..

शरीरात प्रोटीन्सची कमतरता आहे हे कसं ओळखायचं? तब्येतीमध्ये हाेणारे 'हे' बदल सांगतात सावध व्हा..

8 Symptoms That Shows Protein Deficiency: अनेकांच्या शरीरात प्रोटीन्सची कमतरता असते पण ती लक्षातच येत नाही त्यामुळे मग त्याच्यावर योग्य तो उपाय कसा करायचा हे लक्षातच येत नाही...(how to get rid of protein deficiency?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2025 19:54 IST2025-03-01T16:10:36+5:302025-03-01T19:54:54+5:30

8 Symptoms That Shows Protein Deficiency: अनेकांच्या शरीरात प्रोटीन्सची कमतरता असते पण ती लक्षातच येत नाही त्यामुळे मग त्याच्यावर योग्य तो उपाय कसा करायचा हे लक्षातच येत नाही...(how to get rid of protein deficiency?)

8 symptoms that shows protein deficiency, how to get rid of protein deficiency, 8 changes in our body because of protein deficiency | शरीरात प्रोटीन्सची कमतरता आहे हे कसं ओळखायचं? तब्येतीमध्ये हाेणारे 'हे' बदल सांगतात सावध व्हा..

शरीरात प्रोटीन्सची कमतरता आहे हे कसं ओळखायचं? तब्येतीमध्ये हाेणारे 'हे' बदल सांगतात सावध व्हा..

Highlightsशरीरात प्रोटीन्स कमी असतील तर भूक वाढल्यासारखी होते किंवा मग सतत काही ना काही खावं वाटतं..

प्रोटीन्सची कमतरता बहुतांश लोकांच्या शरीरात दिसून येते. त्यात शाकाहारी लोकांच्या शरीरात तर प्रोटीन्सची नेहमीच कमतरता असते. त्यामुळे त्यांना वेगवेगळे त्राससुद्धा होत असतात. शरीराला प्रोटीन्सची गरज आहे, हे आपलं शरीर वेळोवेळी वेगवेगळ्या सूचना देऊन सांगत असतं. पण असं असूनही आपलं त्याकडे लक्ष नसतं. कारण हा सगळा त्रास प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे होत आहे, हे आपल्याला माहितीच नसतं. त्यामुळे मग त्यावर योग्य तो उपाय केला जात नाही आणि तब्येतीच्या तक्रारी मग वाढतच जातात (how to get rid of protein deficiency?). असं तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून आपल्या शरीरात प्रोटीन्सची कमतरता आहे हे सांगणारी काही लक्षणं वेळीच ओळखा..(8 symptoms that shows protein deficiency)

 

शरीरात प्रोटीन्सची कमतरता आहे हे कसं ओळखायचं?

१. UCLA Health यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार प्राेटीन्सच्या कमतरतेमुळे स्नायूंमध्ये नेहमीच वेदना होतात, थकल्यासारखे वाटते.

२. प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे केस खूप गळून पातळ होतात. नखं लगेच तुटतात, त्वचा खूप जास्त कोरडी होते.

फ्रिजमध्ये 'हे' पदार्थ २४ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवू नका, आरोग्यासाठी ठरतात अतिशय घातक

३. प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे ओटीपोट, पाय, तळपास, हात याठिकाणी सूज येते. पण अनेकजणांना ते प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे होत आहे, हे लक्षातच येत नाही. त्यांना तो लठ्ठपणा वाटतो आणि ते त्याकडे दुर्लक्ष करतात.

४. शरीरात प्रोटीन्स कमी प्रमाणात असतील तर रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. त्यामुळे वारंवार आजारी पडणे, कोणताही संसर्ग खूप पटकन होणे, असा त्रास होऊ लागतो.

 

५. शरीरावर झालेल्या जखमा लवकर भरून येत नसतील तर प्राेटीन्सची कमतरता असण्याचं ते एक प्रमुख लक्षण असतं.

६. वारंवार मूड बदलणे, खूप चीडचीड होणे, एकाग्रता कमी होणे, पटकन निर्णय न घेता येणे ही सुद्धा प्रोटीन्सच्या कमतरतेची लक्षणं आहेत.

आलिया भटने लेकीचे सोशल मीडियातले सगळे फोटो डिलिट केले! पण तुमच्या मुलांच्या फोटोचं काय..

७. शरीरात प्रोटीन्स कमी असतील तर भूक वाढल्यासारखी होते किंवा मग सतत काही ना काही खावं वाटतं.. त्यातही जास्त कॅलरी असणारे, कार्बोहायड्रेट्स जास्त असणारे, खूप गोड असणारे पदार्थ खाण्याची इच्छा होते.

८. प्रोटीन्सची कमतरता असणाऱ्या लोकांना फॅटी लिव्हरचा त्रास होतो. 

 

Web Title: 8 symptoms that shows protein deficiency, how to get rid of protein deficiency, 8 changes in our body because of protein deficiency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.