स्त्रियांना होणाऱ्या कॅन्सरच्या प्रकारांपैकी ब्रेस्ट कॅन्सरचे (Breast Cancer) प्रमाण हे सगळ्यांत जास्त असल्याचे दिसून येते. भारतीय स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढू लागले आहे. स्त्रियांमध्ये उद्भवणाऱ्या कॅन्सरच्या प्रकारांपैकी ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण ३२ % इतके असून, दर ३० महिलांमध्ये एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते. ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे आणि संकेत, महत्वाचे घटक आणि नियमित चाचणी केल्यास त्याचे वेळीच निदान होऊ शकते, यामुळे वेळीच योग्य ती खबरदारी घेतल्यास सुरुवातीच्या टप्प्यावरच तो पूर्णपणे बरा करता येऊ शकतो. ब्रेस्ट कॅन्सरची सर्वात मोठी समस्या ही आहे की, काहीवेळा तो शेवटच्या टप्प्यात आल्यावर लक्षात येतो. त्यामुळे, महिलांनी स्वत: वेळोवेळी स्तनांची तपासणी करत राहणे आवश्यक आहे.
ब्रेस्ट कॅन्सरचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे स्तनांमध्ये गाठ येणे, आपल्याला फक्त हे एकच लक्षण माहित असते. परंतु ब्रेस्ट कॅन्सरचे हे मुख्य लक्षण असले तरीही हे ब्रेस्ट कॅन्सरचे एकमेव लक्षण नाही. याशिवायही ब्रेस्ट कॅन्सरची () आणखी काही लक्षणे आहेत, ज्याकडे कधीच दुर्लक्ष करू नये. २० वर्षांवरील सर्व स्त्रियांनी, मुलींनी 'सेल्फ ब्रेस्ट एग्झॅमिनेशन ', म्हणजेच स्तनांची स्वतः तपासणी करणे आवश्यक आहे. अभिनेता अर्जुन कपूरची बहीण आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंजर अंशुला कपूर (Anshula Kapoor) हिने, स्त्रियांनी घरच्याघरी 'सेल्फ ब्रेस्ट एग्झॅमिनेशन' (Self-Breast Examination)कसे करावे हे सोप्या ८ स्टेप्समध्ये सांगितले आहे. याबाबत अधिक माहिती देणारा एक व्हिडीओ तिने इंस्टाग्रामवर नुकताच शेअर केला आहे. अंशुला कपूरने इंस्टाग्रामवर एका व्हिडिओद्वारे स्वत: स्तनाची तपासणी कशी केली जाते हे स्पष्ट केले आहे. तसेच ही चाचणी करताना कोणत्या ८ गोष्टी लक्षात ठेवाव्यात ?(8 things to keep in mind when you do your monthly self breast exam).
'सेल्फ ब्रेस्ट एग्झॅमिनेशन' म्हणजे काय ?
स्वत:च स्वत:च्या स्तनांची तपासणी करणं म्हणजे 'Self-Breast Examination'. घरच्या - घरी अत्यंत सोप्या पद्धतीने काही मिनिटात स्त्रिया 'Self-Breast Examination' करू शकतात. प्रत्येकवेळी डॉक्टरांकडे जाण्याऐवजी स्त्रिया घरीच स्वतःचे स्वतः स्तन तपासून पाहू शकतात. ही मासिक तपासणी तुम्हाला संसर्ग, स्तनाचा आजार किंवा ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे असू शकणारे बदल शोधण्यात मदत करते.
'सेल्फ ब्रेस्ट एग्झॅमिनेशन' करण्याच्या ८ स्टेप्स कोणत्या ?
१. ब्रेसियर घालून मगच 'सेल्फ ब्रेस्ट एग्झॅमिनेशन' करावे. ही टेस्ट करताना शक्यतो आरशासमोर उभे राहून मगच करावी. तुम्ही उभे असताना किंवा बसून ही चाचणी करू शकता.
२. एका हाताच्या तळव्याने तुमच्या छातीत आणि काखेत गुठळ्या किंवा सूज आली आहे की नाही ते तपासण्याचा प्रयत्न करा. काखेत आणि मानेपासून कॉलरबोन्सकडे हळुहळु पुढे येत हातांनी हलका दाब देत तपासणी केली पाहिजे. ही तपासणी करताना तुम्हाला काही वेदना होत आहेत का ते तपासून पाहा.
३. कोणत्याही प्रकारचा स्त्राव, कोणत्याही प्रकारचे डाग किंवा रंगात कोणताही बदल आहे का हे पाहण्यासाठी आपल्या सरळ तळव्याने स्तनाचा प्रत्येक भाग तपासा. स्तनांना सूज येणं, स्तन लाल होणे, व्रण आले आहेत का याकडे लक्ष द्या.
निती आयोगाच्या संचालक उर्वशी प्रसाद सांगतात, दुर्मिळ प्रकारच्या कॅन्सरशी मी लढले पण...
पावसाळ्यात त्वचेचे आजार नको, इन्फेक्शनचा त्रास नको? ‘हे’ खा, त्वचेच्या समस्या राहतील दूर...
४. त्वचेच्या संरचनेत काही डोळ्यांना सहज दिसतील असे बदल आहे का ते देखील पहा. जळजळ किंवा द्राक्षा सारखी गोल गाठ, सूज, लालसरपणा, खाज किंवा स्तनांच्या आकारात काही बदल झाला आहे का ते पाहा. आरशासमोर उभे राहून हात कंबरेवर ठेवा. आता स्तन आणि स्तनाग्रच्या रंगात, स्वरूपात,त्वचेत काही बदल झालेत का हे पहा. तसेच स्तनाग्रातून कोणत्याही प्रकारचा स्त्राव येतो का ते तपासा.
५. जर तुमची मासिक पाळी सामान्य असेल, तर तुमची मासिक पाळी येऊन गेल्यानंतरच तुंम्ही ही टेस्ट करा. जर तुम्हाला रजोनिवृत्ती सुरू झाली असेल किंवा तुमची मासिक पाळी नियमित होत नसेल, तर प्रत्येक महिन्याचा पहिला दिवस किंवा इतर काही निश्चित तारीख ठरवून नेहमी त्याच तारखेला टेस्ट करा. तुम्ही ही तपासणी दर महिन्याला त्याच दिवशी करावी.
६. तुम्ही ही चाचणी किमान दोनदा करावी. एकदा जेव्हा तुमचे हात खाली असतात आणि दुसऱ्यांदा जेव्हा तुमचे हात वर असतात. हात सरळ रेषेत वर करा. हळूहळू स्तनाच्या बाहेरील बाजूकडून आतील दिशेने गोलाकार दिशेने हात फिरवा. मात्र सुरवात काखेपासून करा. एखादी गाठ, जाडसरपणा जाणवतोय का याकडे लक्ष द्या.
७. तुमच्या शरीरात काय सामान्य आहे आणि त्यात काही बदल होत असतील तर ते का होत आहेत हे जाणून घेणे हाच या चाचणीचा मुख्य उद्देश आहे. तुम्हाला लक्षात ठेवण्यात अडचण येत असल्यास, तुम्ही हे बदल तुमच्या फोनवरील रिमाइंडरमध्ये किंवा वहीत नोंदवू शकता.
८. तपासणी करताना पूर्ण स्तनांचे संपूर्ण परीक्षण करा.काखेपासून दोन्ही स्तनांच्या मध्यापर्यंत तसेच खांद्यापासून पोटाच्या वरच्या भागापर्यंत गोलाकार पद्धतीने तसेच वरून खाली पूर्ण स्तन स्पर्श करून व्यवस्थित परीक्षण करा. काही वेगळेपणा जाणवल्यास लगेच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या .