उन्हाळा सुरु असून, बऱ्याच भागात तपामानाचा पार चाळीशी पार गेला आहे (Summer Eye care tips). कडक उन्हात आरोग्य आणि त्वचेची काळजी घेण्यासोबत डोळ्यांचीही घ्यायला हवी (Eye Care). खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांना उन्हाचा सर्वाधिक त्रास होतो. सूर्यप्रकाशात शेतात काम करणाऱ्या लोकांसाठी डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. शिवाय शहरात राहणाऱ्यांनीही डोळ्यांची तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे.
डोळ्यांच्या काळजी घेण्याबाबत आय-क्यू सुपर स्पेशालिटीचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. अजय शर्मा सांगतात, 'तीव्र सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषण यांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे डोळ्यांच्या आजारांचा धोका वाढतो. सूर्याच्या तीव्र किरणांमुळे डोळ्यांच्या टिश्यूवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे 'फोटोकेरायटिस' आणि 'पेटेरिजियम' होऊ शकते. म्हणजेच पृष्ठभागावर गाठसारखी समस्या निर्माण होऊ शकते. शिवाय डोळ्यांना इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो'(8 Tips to Keep Your Eyes Safe This Summer).
सूर्याच्या घातक किरणांपासून डोळ्यांचे रक्षण करायचं असेल तर..
- उन्हात बाहेर जाणं होतंच. अशावेळी त्वचा आणि डोळ्यांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. उन्हाचं बाहेर जाताना, टोपी आणि सनग्लासेस घालायला विसरू नका.
- धुळीच्या ठिकाणी काम करताना चष्मा घाला. यामुळे डोळ्यांच्या इन्फेक्शनचा धोका कमी होतो. शिवाय डोळ्यांना जळजळ होत नाही.
- उन्हाळ्यात डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे. जर डोळ्यांना कोणताही त्रास असेल तर, लवकर कळून येईल, व त्यावर उपचार घेणे सोपे होईल.
२ मिनिटांत तयार होणारे नूडल्स खाता की दवाखान्यात भरती व्हायची तयारी करताय? वाचा, नक्की होतं काय..
- प्रखर सूर्यप्रकाश आणि धुळीचा सामना करण्यासाठी आपण चष्मा घालतोच, पण नियमित डोळे स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. दिवसातून एकदा डोळे स्वच्छ धुवा.
- उन्हामुळे डोळे चुरचुरत असतील किंवा लाल होत असतील तर, डोळ्यांच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, आयड्रॉप्सचा वापर करा. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळेल.
- उन्हाळ्याच्या दिवसांत एकूणच हवेतील तापमानामुळे शरीर आणि डोळेही कोरडे पडतात. त्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे, पाणीदार फळे खाणे, सरबत, ताक यांसारख्या द्रव पदार्थांचा आहारात समावेश करा.
पोटात नुसती आग? गॅसेसचा त्रास? उन्हाळ्यात हे ५ जादूई पदार्थ खा, पोटाला मिळेल गारवा
- आपण सतत उन्हात असो किंवा स्क्रीनवर काम, ठराविक वेळाने डोळ्यांचे व्यायाम करत राहा. डोळ्यांची उघड़झाप करणे, डोळे पाण्याने धुणे असे उपाय करावेत. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.
- उन्हाळ्यात डोळे येणे, डोळ्यांतून घाण येणे, डोळे चिकटणे, यासह इतर समस्या निर्माण होतात. अशावेळी नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही उत्तम.