भारतात खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये भेसळ दिसून येते. नकली खाद्यपदार्थ मिळण्याचे प्रमाण सध्या खूपच वाढले आहे. व्यापारी जास्त लाभ मिळवण्याच्या प्रयत्नात उत्पादनांच्या क्वालिटीकडे लक्ष देत नाहीत. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणच्या सुचनांकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. जयपूरमध्ये ८०० किलो बनावट पनीर जप्त करण्यात आलं आहे. (Paneer Purity Check Steps) अशा घटना प्रत्येक ठिकाणी वारंवार घटत असतात.
भेसळयुक्त पनीर खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. फूड पॉयझनिंग, ॲलर्जी, इम्यून सिस्टिम कमकुवत होणं, कॅन्सर यांसारख्या समस्या उद्भवतात. भेसळयुक्त पनीर वेळीच ओळखून तुम्ही याची चाचणी करू शकता. (800 kg fake paneer seized, cancer risk due to adulterated paneer FSSI says identify paneer purity in 3 seconds)
बाजारात भेसळयुक्त पनीर मोठ्या प्रमाणात विकले जाते. याला सिंथेटीक पनीर असंही म्हणतात. जे तब्येतीसाठी नुकसानकारक ठरतं. हे बनवण्यासाठी वेगवेगळ्या रसायनांचा वापर केला जातो. युरिया, डिटर्जेंट, स्फरिक एसिड वापरले जाते. दूधाऐवजी तुम्ही रिफाईंड गव्हाचा वापर करू शकता.
३० दिवसांत वजन कमी करण्याचा डॉक्टर सांगतात खास हेल्दी उपाय, पोटही होईल कमी
हे तयार करण्यासाठी दूधात सोडीयम बायकार्बोनेट म्हणजे बेकिंग सोडा मिसळला जातो. नंतर हे मिश्रण पाम ऑईल किंवा वनस्पती तेलात मिसळले जाते. या मिश्रणात बेकींग पावडर घालून तुम्ही एका भांड्यात ठेवून दिलं जातं हे तयार झाल्यानंतर पनीरप्रमाणे विकलं जातं.
एफएसएसएआय ने काही सोप्या ट्रिक्स वापरून बनावट पनीर ओळखायचं कसं ते सांगितले आहे. पहिल्या पद्धतीनुसार एक पॅन घ्या, त्यात पनीर उकळवून घ्या. उकळलेल्या पनीरमध्ये आयोडीन टिंचरचे काही थेंब घाला. जर पनीरचा रंग नीळा झाला असेल तर ते बनावट आहे. पनीरचा रंग सारखाच राहिला असेल तर ते नकली आहे. ही टेस्ट फक्त स्टार्चची भेसळ माहित करण्यासाठी आहे.
आठवड्यात 'या' दिवशी तुम्हालाही येऊ शकतो हार्ट ॲटॅक; डॉ. श्रीराम नेनेंनी सांगितलं कारण.
दुसरी पद्धत अशी की, उकळलेले पनीर पाण्यात थंड होऊ द्या. या पाण्यात थोडी तूर डाळ घाला आणि १० मिनिटं तसंच ठेवून द्या. नंतर पाण्याचा रंग हलका लाल झाला असेल तर पनीरमध्ये भेसळ असू शकते. ही टेस्ट फक्त रंगातील भेसळ माहिती करून घेण्यासाठी उत्तम ठरते.
तिसरी पद्धत अशी की पनीर विकत घेतल्यानंतर वास घेऊन पाहा. पनीरचा वास जास्त आंबट असू नये. जर पनीर उघड्यावर ठेवलं असेल तर तुम्ही चाखून पाहू शकता. चांगले पनीर दुधासारखे लागते आणि मऊ असते. पनीर दाबल्यानंतर खूप घट्ट वाटत असेल तर असे पनीर खाऊ नये. याव्यतिरिक्त पनीर पाहून तुम्ही त्याबद्दल अंदाज लावू शकता. भेसळयुक्त पनीरमुळे किडनीच्या समस्या, पचनाच्या समस्या, ॲलर्जिक रिॲक्शन उद्भवू शकतात. याशिवाय कॅन्सरचा धोकाही उद्भवू शकतो. ज्यामुळे इम्यूनिटी कमकुवत होते.