Join us   

बॉडी डीटॉक्स करणं खरंच गरजेचं असतं का? नेमकं काय होतं त्यामुळे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2022 11:23 AM

9 Reasons To Detoxify Your Body : प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी बॉडी का डीटॉक्स करायची याची ९ महत्त्वाची कारणं सांगितली आहेत.

ठळक मुद्दे बॉडी डीटॉक्स करणं उत्तम आरोग्यासाठी का गरजेचं असतं याविषयी...बॉडी डिटॉक्सिफाय केल्यानंतर मिळणाऱ्या फायद्यांविषयी सांगताहेत आहारतज्ज्ञ..

बॉडी डीटॉक्स करायला हवी असं आपण गेल्या काही दिवसांत बरेचदा ऐकतो. आता बॉडी डीटॉक्स करणे म्हणजे नेमके काय तर शरीरातील अनावश्यक टॉक्सिन्स, अनावश्यक घटक शरीराबाहेर फेकण्याची क्रिया. डीटॉक्स करायचे म्हणजे नेमके काय तर आपण घेत असलेल्या आहारामध्ये आणि जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करणे. शरीराचे शुद्धीकरण करण्याची क्रिया यामध्ये होत असल्याने ठराविक काळाने बॉडी डीटॉक्स करणे गरजेचे असते. कधी वजन कमी करण्यासाठी तर कधी पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी हे बॉडी डीटॉक्सिंग अतिशय आवश्यक असते. शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडल्याने शरीर तर शुद्ध होतेच पण त्यामुळे त्वचा, केस यांवरही त्याचा चांगला परीणाम दिसून येतो. पण हे डीटॉक्सिंग का गरजेचे असते असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी बॉडी का डीटॉक्स करायची याची ९ महत्त्वाची कारणं सांगितली आहेत. ती कोणती पाहूया (9 Reasons To Detoxify Your Body)....

(Image : Google)

१. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि शरीराचे पोषण व्हावे, शरीरात कोणत्या प्रकारची अशुद्धी असेल, काही समस्या असतील तर त्या दूर होण्यास याचा चांगला उपयोग होतो. 

२. डीटॉक्स प्रक्रियेमुळे आपण खात असलेल्या आहारात काही बदल करायला हवेत का, कोणत्या चुकीच्या गोष्टी आपण करत आहोत याचा अभ्यास यानिमित्ताने आपल्याला करता येतो.

३. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत डीटॉक्सिफिकेशन अतिशय उपयुक्त ठरते. 

४. अनेकदा आपली किडनी, यकृत, मूत्राशय हे सतत कार्यरत असल्याने त्यांच्यावर ताण येण्याची शक्यता असते. अशावेळी त्यांच्यावरचा हा ताण कमी करण्यासाठी डीटॉक्सिफिकेशनची क्रिया उपयुक्त ठरते.

५. शरीराची ऊर्जा वाढण्यास याची मदत होते. 

६. त्वचा सतेज आणि स्वच्छ होण्यास याचा चांगला उपयोग होतो. 

७. वृद्धत्त्व कमी करण्यास डीटॉक्सिफिकेशनचा चांगला उपयोग होतो. 

८. शरीराची लवचिकता वाढण्यास आणि प्रजनन क्षमता सुधारण्यास फायदेशीर 

९. आपल्या शरीराला नेमक्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे समजण्यास मदत होते. तसेच संवेदना जागृत होतात आणि अन्नाची चव चांगली येण्यास याचा फायदा होतो. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल