भारतीयांसाठी तूप म्हणजे वरदान (Ghee). यामुळे आरोग्यासह स्किन आणि केसांनाही फायदा होतो (Skin - Hair Tips). पण जास्त प्रमाणात तूप खाणंही आरोग्यासाठी घातक (Health Tips). जास्त प्रमाणात आणि नियमित तूप खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो असे म्हटले जाते. कारण त्यात सॅच्युरेटेड फॅट्स असतात. त्यामुळे रक्तवाहिन्या बंद होऊ शकतात.
पण तूप खाण्याचीही योग्य पद्धत असते. योग्य पद्धतीने तूप खाल्ल्यास आरोग्याला फायदाच होतो. यामुळे नजर तीक्ष्ण, स्नायू मजबूत आणि हृदयाचे आरोग्य सुदृढ राहते. जर आरोग्याला तुपातील पौष्टीक गुणधर्म मिळावे असे वाटत असेल तर, डॉक्टर रोबिन शर्मा यांनी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करून पाहा. आरोग्याला फायदा नक्कीच होईल(A teaspoon of ghee in warm water can unlock these health benefits).
देशी तूप खाण्याचे फायदे
नजर होईल तेज
डॉक्टर रोबिन यांच्या मते, देशी तूप डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. गायीच्या तुपात समप्रमाणात आपण खडीसाखर आणि आवळा पावडरही मिक्स करू शकता. दिवसातून दोनदा १ छोटा चमचा खा. नंतर वाटीभर कोमट दूध प्या. यामुळे डोळे, केस आणि त्वचा तजेलदार होईल. जर केस अकाली पांढरे झाले असतील तर, देशी तुपाचा आहारात समावेश करा.
थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा
मसल्स वाढतील
२ पिकलेल्या केळ्यांमध्ये एक चमचा देशी तूप आणि तितक्याच प्रमाणात साखर मिसळा आणि रोज सकाळी नाश्त्यात खाण्यास सुरुवात करा. नंतर काही वेळाने कोमट दूध प्या. ज्यामुळे वजन आणि स्नायू वाढण्यास मदत होईल. वजन वाढीसाठी हा उत्तम पर्याय आहे.
हृदयासाठी फायदेशीर
देशी तुपात अनेक गुणधर्म असतात. त्यात ओमेगा ३ आणि ओमेगा ९ आढळते. जे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे हृदयाचे आरोग्यही सुधारते.
दिवाळीत फोटो सुंदर यायला हवेत? आजपासून फॉलो करा ७ गोष्टी- १० दिवसांत घटेल वजन
मधुमेहांसाठी फायदेशीर
देशी तूप मधुमेहांसाठी फायदेशीर ठरते. याचा ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्याच्या मदतीने चयापचयाची क्रिया सुधारते. यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. त्यामुळे जर आपण मधुमेहग्रस्त असाल तर, आहारात तुपाचा समावेश करा.